नवले पूल अपघात घटनेनंतर खासदार अ‍ॅक्शन मोडवर, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अधिकाऱ्यांना सूचना

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात भेट दिली आणि माध्यमांशी संवाद साधला.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 15T170244.761

पुण्यातील नवले पूल येथील भीषण अपघातानंतर अशा घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणांवरची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. (Pune) वाहतूक विषयक सुधारणा, वेगमर्यादा, तसंच सेवा रस्त्यांच्या कामातील भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून महिनाभरात याबबातचा अहवाल सादर करावा’, अशा सूचना केंद्रीय नागरी विमाम उड्डाण राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी केली. मोहोळ यांनी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात घडलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर नऊ ते दहा जण जखमी झाले. त्यानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात भेट दिली. शासकीय विश्रामगृहात शनिवारी मोहोळ यांनी विविध यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त (पीएमआरडीए) डाॅ. योगेश म्हसे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, राज्य महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात: सात जणांचा मृत्यू, वाहनांनी घेतला पेट

या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मोहोळ म्हणाले, ‘नवले पूल अपघात प्रकरणानंतर दीर्घकालीन उपायोजनांसह विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. नऱ्हे ते रावेत दरम्यान उन्नत मार्ग बांधणाची आरखडा मंजूर झाला. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यात येणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. हे काम प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. जांभुळवाडी ते वारजे परिसरापर्यंत वर्तुळाकर मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या मार्गाने वाहतूक वळवली जाऊ शकते.

स्पीड गनची संख्या वाढविण्यात येणार आहे. स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल दरम्यान तीव्र उतार आहे. तेथे गतिरोधक पट्टी (रम्बलिंग स्ट्रिप) बसवण्यात आल्या आहेत. तीव्र उतारावर वेग कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जड वाहनांसाठी वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटरवरुन ३० किलोमीटर अशी करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध जागेवरच कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आल्याचं ते म्हणाले.

follow us