Download App

राणेंचा पुन्हा आरोप; दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच घेतलं नाव, मुनगंटीवार अन् म्हात्रेही पुढं

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "दिशा सालियन प्रकरणात माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. पण तिच्या वडिलांनी जर दबाव

  • Written By: Last Updated:
Disha Salian Death Case : दिशा सालियनच्या वडिलांनी आज जी नावं घेतली ती मी पहिल्या दिवसांपासून सांगत होतो, त्यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात आहे असा थेट आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. (Salian) तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काय काय केलं होतं हे दिशाच्या वडिलांनी याचिकेतून सांगितलं आहे. त्यावेळी आमच्यावर खोटेपणाचा आरोप करणारे आता काय करणार असा प्रश्नही नितेश राणे यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्याच या प्रकरणावर बोलताना या प्रकरणी विधानभवनात चर्चा होऊ शकते असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटलं आहे. दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली असं सांगत तिच्या वडिलांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात नितेश राणे आणि अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे असं दिशाच्या वडिलांनी म्हटलं आहे.

दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार अन् हत्या; आदित्य ठाकरे ते सुरज पांचोली अनेकांवर धक्कादायक आरोप 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “दिशा सालियन प्रकरणात माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. पण तिच्या वडिलांनी जर दबाव असल्याची तक्रार केली असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. या विषयावर उद्या विधानभवनात चर्चा होऊ शकते. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणात जर नितेश राणे किंवा आणखी कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणाना दिले पाहिजे. असे कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना देऊन मदत कारण गरजेचं आहे असंही ते म्हणाले आहेत.

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीही दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, दिशा सालियान मृत्यूच्या पाच वर्षानंतर तिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. महाविकास आघाडी सरकार त्या वेळी असताना त्यांच्यावर दबाव होता. महायुतीचं सरकार आल्यानंतर न्याय मिळेल या हेतून त्यानी या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी केली आहे असं म्हणाल्या आहेत.

follow us