Jalna Maratha Protest : उद्धव ठाकरेंना, आरक्षण कसं दिलं जातं हे माहितीये का? असा खोचक सवाल शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जालन्यातील अंतरवली चराटी गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पोलिस-आंदोलनकांमध्ये हमरी-तुमरी झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचं समोर आलं. या घटनेप्रकरणी उद्धव ठाकरेंनी जखमी आंदोलकांची भेट घेतली, त्या भेटीवरुन गिरीश महाजनांनी ठाकरेंवर निशाणा साधला. बुलढाण्यात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते.
Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल
गिरीश महाजन म्हणाले, लोकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करु द्या, जालन्यात एक घटना घडली. या घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, विरोधकांकडून या घटनेचं राजकारण केलं जातंय, उद्धव ठाकरे तिथं जाऊन म्हणतात, हे सरकार तुम्हाला आरक्षण देणार नाही, पण अडीच वर्षात तुम्ही आरक्षण दिलं का? असा सवाल गिरीश महाजनांनी केला आहे.
Aditya L1 Mission :भारताचं पहिलं सूर्य मिशन झेपावलं! आदित्य L1 चा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू…
शरद पवारांची नाचक्की :
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मोठे नेते आहेत, पण त्यांची सध्या नाचक्की झाली आहे. लाठीचार्ज घटनेवर ते आंदोलकांच्या भेटीदरम्यान, गेले असता त्यांना लोकांना विचारलं की, 40 वर्ष कुठे होतात? आज आम्हाला भेटायला आले आहेत, 40 वर्ष तुमचं सरकार होतं तुम्ही काय केलं, राजकारण डोळ्यासमोर ठेऊन विचारपूस करीत आहेत, लोकांनी पवारांना परतावून लावलं, अर्वाच्च भाषेत लोक त्यांना बोलले असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत.
Thane Crime : पत्नीची गोळी झाडून हत्या, त्याचवेळी पतीचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू
तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अडीच वर्षांत तुम्हाला चांगले वकील नेमलेले नाहीत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं, पण विरोधक आम्हांला दोष देत आहेत, उद्धव ठाकरे यांना आरक्षण कसं दिलं जात हे माहित आहे का? असा खोचक सवालही गिरीश महाजनांनी केला आहे.
दरम्यान, विरोधकांना आता लोकं समोर उभं करणार नाहीत, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, महाविकास आघाडी सरकारमध्ये ते नाकारलं असल्याची टीकाही गिरीश महाजन यांनी केली आहे. मात्र, मराठा आरक्षण दिल्याशिवाय महायुतीचं सरकार स्वस्थ बसणार नसल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत.