Download App

Devendra Fadnavis : पुढील दीड वर्षे पदाची अपेक्षा ठेवूच नका : प्रीतम मुंडे यांच्या मुद्द्याला उत्तर

  • Written By: Last Updated:

नाशिक : मला काय मिळाल या पेक्षा आता पक्षासाठी काय करता येईल हे कार्यकर्त्याने पाहण्याची गरज आहे. पुढच्या काळात सरकार आल तर सर्वांना न्याय देता येईल. असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यान दिला. पदे येतील जातील परंतु आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. येत्या काळात जनता आपल्यालाच सत्तेत ठेवणार आहे. त्यामुळे कुठलीही अपेक्षा नकरता कामे करा. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरवात केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला भाषणात प्रीतम मुंडे यांनी कार्यकर्त्यमच्या भावना बोलून दाखवल्या. आपण ओबीसी समाजाला आरक्ष्ण दिले, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न जरतोय. पण आता भाजपा कार्यकर्त्याना पक्षात आरक्ष्ण मिळवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अस सांगत टाळ्या मिळवल्या होत्या.

महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आम्हीच आहोत हे भारतीय जनता पक्षाने विरोधकांना वारंवार दाखून दिल आहे. महाविजयाचा मंत्र आज आपण घेत आहोत. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करायचे आहे. असे आवाहन फडणवीसांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना केले.

नाशिकमध्ये संकल्प घेतला कि त्यासाठी प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळतो. देशामध्ये ज्यांना अहंकार होता अशांचा अहंकार मोदींनी संपवला आहे. अहंकारच सरकार पडून मोदींनी सर्वसामान्य माणसाचं सरकार आणलं आहे. देशातील सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे असं देखील ते म्हणाले.

 

नाशिकमध्ये दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. यावेळी राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गद्दारांचं सरकार म्हणणाऱ्यांना उत्तर देत म्हणाले हे सरकार गद्दारांचं नाही, तर खुद्दारांचं सरकार आहे. जनतेसाठी ज्यांची खुद्दारी आहे, हिंदुत्वासाठी ज्यांची खुद्दारी आहे त्यांचं हे सरकार असं फडणवीस म्हणाले.

Nashik BJP Meet : चर्चा तर होणारच.. भाजप बैठकीसाठी फडणवीस-पंकजा मुंडे एकाच कारमधून 

महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्राची अडीच वर्ष वाया घातली असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्यांनी अडीच वर्ष फक्त स्वतःची घर भरली आपल्याला अडीच वर्षात पाच वर्षाचं काम करायचं आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही मिळून 20 -20 ची मॅच सुरु केली आहे आम्ही जोरदार बॅटिंग करत आहोत 2024 विजय मुळूनच आम्ही हि बॅटिंग संपवणार आहोत असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

Tags

follow us