दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतल्या खारघर येथे निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं धर्माधिकारी यांच्या अनुयायांनी हजेरी लावली होती. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यामुळं उष्माघात किती जीवघेणा ठरू शकतो, याचा प्रत्यय आला. राज्यभरातील तापमानात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
गेल्या 8 -10 वर्षांपासू राज्यात उन्हाचा पारा हळूहळू वाढत चालला आहे. मे महिन्यामध्ये जाणारा उन्हाच्या झळा आता एप्रिलमध्येही जाणवू लागल्या आहेत. एप्रिलच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने झोडपून काढल्यांतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ झाल्यानं महाराष्ट्र होरपळत आहे. राज्याच्या अनेक भागात 40 डिग्री सेल्सियशच्या वर तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळ नागरिकांना घराबाहेर पडणंही अवघड झालं आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
#SatarkAlert #Heatwave #Fire
१९ एप्रिल २०२३#कोकण #मध्यमहाराष्ट्र #मराठवाडा आणि #विदर्भ या विभागांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. नागरिकांनी उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शक्यतो बाहेर पडू नये. pic.twitter.com/r5vpQ34I2g— satark (@satarkindia) April 19, 2023
उन्हाच्या तीव्र झळामुळं नागरिक चांगलचे बेजार झाले आहेत. तापमानात वाढ होत असल्यानं रात्रीचा उकाडाही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हवामान विभागाने आपल्या अलर्टमध्ये सांगितले की, राज्यातील वाढतं तापमान हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. राज्याच्य कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागामध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती आहे. नागरिकांना उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत शक्यतो बाहेर पडू नये, असा इशारा हवामान खात्याने दिला.
पायरसी, सिनेमॅटोग्राफीबाबत मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राष्ट्रीय क्वांटम मिशनला मंजुरी
या अलर्टनुसार, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिलोरी, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्शियसच्या पुढे नोंदवले गेले आहे. त्यामुळं उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत घराबाहेर पडणे, शारिरीक कष्टाची कामे टाळावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे.