राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नका, दिवाळीनंतर डावपेच दाखवून देऊ; आमदार खताळांचा इशारा

Amol Khatal : मला राजकारण कळत नाही, असा काहींचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. दिवाळीनंतर राजकारणाचे डावपेच कसे

Amol Khatal

Amol Khatal

Amol Khatal : मला राजकारण कळत नाही, असा काहींचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. दिवाळीनंतर राजकारणाचे डावपेच कसे खेळायचे असतात, हे दाखवून देऊ. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे व माजी उपमुख्य मंत्री स्व. अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे मला राजकारण शिकवण्याच्या फंदात कोणीही पडू नका. दिवाळीनंतर डावपेच काय आहे हे मी तुम्हाला दाखवून देईल असा घनाघात आ. अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे नाव न घेता केला

संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, विभागप्रमुख बाळासाहेब जगदाळे, आरपीआयचे शहरप्रमुख कैलास कासार, उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शाखाप्रमुख भैया रंगरेज, उपशाखाप्रमुख सागर अभंग, सचिव , प्रकाश खंडागळे, कार्याध्यक्ष नितीन पानसरे यांच्यासह शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले म्हणून विरोधकांनी हुरळून जाऊ नये. तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करण्याचे काम करतात; मात्र आमचे कार्यकर्ते नगरसेवक नसले तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून जनसेवक म्हणून काम करत आहे शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. तुमच्या नातेवाईकांचे दवाखाने सुरू राहावे, म्हणून तुम्ही नगरपालिकेचे कॉटेज रुग्णालय बंद पाडले आहे त्यामुळे आपण घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये १०० खाटांचे केवळ महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. लवकरच आरोग्यमंत्री संगमनेरमध्ये येऊन येथील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलणार असल्याचे आमदार खताळ पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी धाडसी भूमिका घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने विकासकामांना गती दिली. शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, हे शिवसेनेचे धोरण आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आगामी काळात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचतगटांच्या माध्यमा तून विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच गरजू महिलांना शिलाई यंत्रे उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाईल.निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करणारा आमचा पक्ष नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी चोवीस तास कार्यरत राहणे, हेच आमचे ध्येय आहे. सामान्य कार्यकर्त्याला जनतेने संधी दिल्यामुळेच आज मी आमदार झालो आहे. शिववाहतूक सेनेच्या स्थापनेच्या निमित्ताने रिक्षाचालकांना संघटित करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही आमदार खताळ यांनी सांगितले.

दिवाळीत इंधनाविना पेट्रोल पंप? पैसे भरूनही HPCL डीलर्सचे इंधन लोड अडवले

गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक – अमोल खताळ

संगमनेर शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात आणि शहरातील प्रत्येक उपनगरात ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ हा उपक्रम राबवून शिवसेनेच्या शाखा सुरू करण्याचा निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लोकशाही मार्गाने लढविल्या जातील. शिवसेनेचा सामान्य कार्यकर्तादेखील निवडणुकी च्या मैदानात उतरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. बिनविरोध निवडणुकांच्या राजकारणावरून विरोधकांना लक्ष्य करताना, यापुढे संगमनेर तालुक्यात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.

Exit mobile version