डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून गुरुवारी एका दलित युवकाच्या पोटावर खंजरने सपासप वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात घडली. एवढंच नाहीतर हत्या केल्यानंतर दलित वस्तीवर जात दगडफेक केली आहे. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात एकच उडाली असून परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. दरम्यान, या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
अक्षय भालेराव (वय २३) असं मृत युवकाचं नाव असून तो बोंढार हवेली गावातील रहिवासी आहे. अक्षय भालेरावसह, भाऊ गौतम आणि अजय, आई वंदना व वडील श्रावण सर्व जण मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असतात. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनूसार गावातील नारायण विश्वनाथ तिडके यांचं लग्न बामणी येथे झाल्यानंर त्यांनी बोंडार गावात वऱ्हाडास सायंकाळच्या सुमारास वरात काढली.
दिल्लीतील आंदोलक कुस्तीपटूंच्या मागणीची केंद्र सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी; शरद पवारांची मागणी
या वरातीत डी.जे. लावून ते हाताता तलवार, खंजर , काठ्या घेऊन डान्स करुन ओरडत होते. याचदरम्यान, विठ्ठल तिडके याने घरासमोर असलेल्या तिडके यांच्या दुकानावर फिर्यादी आणि मृत अक्षय भालेराव किराणा आणण्यासाठी गेले होते. त्याचवेळी संतोष संजय तिडके अचानक मोठ-मोठ्याने ओरडून आम्हाला जातीवाचक शिव्या देऊ लागला. त्यानंतर यांना जीव मारलं पाहिजे, गावात भीम जयंती का काढता? असे मोठ्याने ओरडला.
कोल्हापूर-हातकणंगले : राष्ट्रवादीचं झालं थोडं अन् आता काँग्रेसनं धाडलं घोडं… शिवसेना कोंडीत!
त्यानंतर कृष्णा गोविंद तिडके, निळकंठ रमेश तिडके, नारायण विश्वनाथ तिडके, शिवाजी दिगंबर तिडके या सर्वांनी लाठ्या-काठ्यांनी व लाथाबुक्यांनी अक्षय भालेराव यास मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यानंतर हात व पाय धरून हातात असणाऱ्या खंजरने पोटात सपासप वार करुन हत्या केली. तेव्हा अक्षय मेलो-मेलो, वाचवा वाचवा… असे म्हणत होता. तेव्हा फिर्यादी भावाला वाचविण्यासाठी मध्ये पडला असता तेथे असलेले महादू गोविंद तिडके, बाबुराव सोनाजी तिडके व बालाजी मुंगल या सगळ्यांनी ‘खतम करुन टाका’, असे म्हणत फिर्यादीलाही लाथा बुक्यांनी मारहाण केली.
पंकजा मुंडेंचा आक्रमक बाणा, खडसेंशी चर्चा; ऐन पावसाळ्यात मराठवाड्याचं राजकारण तापणार?
याचवेळी दत्ता विश्वनाथ तिडके याने त्याचे हातात असलेल्या खंजीरने आईवरही वार केला. मारहाणीत फिर्यादी जखमी झाल्यानंतर आरोपींनी एकत्र येऊन आमचे बौद्ध वस्तीवर जोरदार दगडफेक केली. यावेळी अक्षयच्या आईने लेकरांना सोडा, अशी विनवणी मारेकऱ्यांनी आईलाही दगडाने व लाठ्या-काठ्याने मारहाण केल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे.
या हत्येतील आरोपींनी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने भावावर, आईवर व माझेवर खंजर, लाठ्या-काठ्या व दगडाने हल्ला करुन निर्घृण हत्या करताना पाहिले असल्याचं फिर्यादीने फिर्यादीत म्हटलं आहे. तसेच यावेळी मी भावाला सोडा मारु नका, विनंती केली असता या महाराला सोडून उपयोग नाही असं म्हणत त्याच्यावर सामूहिकपणे प्राणघातक हल्ला करुन त्याची हत्या केली आहे.
घटनेची माहिती समजताच तातडीने पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, या हत्येनंतर नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नांदेड ग्रामीण पोलिसांनी नऊ संशयितांविरुद्ध अॅट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सात जणांना अटक करण्यात आली असून अक्षय भालेराव याच्यावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.