Download App

Video : मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा; मराठी इन्फ्लुएन्सरला केली शिवीगाळ

Javed Shaikh Son Rahil Clashes With Rajshree More : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेने (Rajshree More) मनसे नेते जावेद शेख यांच्या (Javed Shaikh) मुलावर गंभीर आरोप केले आहेत. मद्यपान करून गाडी चालवली अन् अपशब्दही वापरले, असा आरोप राजश्री मोरेने केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगात व्हायरल होत आहे, यावर अनेक प्रतिक्रिया (MNS) देखील आल्या आहेत.

जन सुरक्षा कायद्याद्वारे सरकार मुलभूत हक्क पायदळी तुडवतय; रोहित पवार आक्रमक

राजश्रीच्या गाडीचा अपघात

मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळतेय. राजश्रीच्या गाडीचा रविवारी रात्री अपघात झाला होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत असणारी व्यक्ती स्वत:ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख (Viral Video) असल्याचं सांगत आहे. तो मद्यपान करून गाडी चालवत होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप राजश्रीने केलाय. व्हिडीओमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेमध्ये राजश्रीवर आक्रमकपणे शिवीगाळ करताना दिसून येत आहे. यामध्ये तो राजश्रीला धमकीही देत आहे. “xxx पैसे घे. जा आणि पोलिसांना (Crime News) सांग, मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल, अशी धमकी त्याने राजश्रीला दिलीय.

मी जावेद शेखचा मुलगा…

या घटनेनंतर राजश्रीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात राहिल अर्धनग्न अवस्थेत, अत्यंत आक्रमक भाषण करताना दिसतो. तो राजश्रीला धमकी देताना म्हणतो, xxx पैसे घे…जा आणि पोलिसांना सांग… मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल. या धमकीग्रस्त भूमिकेने वाद आणखीनच चिघळला आहे. व्हिडिओमध्ये राहिल पोलीस अधिकाऱ्यांशी थेट वाद करताना दिसतो. तो मद्यपान केलेला असल्याचे मान्य तरी पोलीस तपासाला सहकार्य न करण्याचा निषेध करतो. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी ताबा घेतला.

महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला, रोहिणी खडसे संतापल्या…

राजकीय दबाव अन् धमक्या

राजश्री मोरे यांनी राहिल शेख विरुद्ध गंभीर आरोपांसह नोंदणी केली. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, राजकीय दबावाने धमक्या देणे व पोलिस कार्यात अडथळे आणणे. त्यांनी FIR ची कॉपी सोशल मीडियावर शेअर केली आहे. राजश्रीने FIR नोंदविल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून तिच्यावर सतत धमक्या मिळत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे तिला मानसिक ताण जाणवू लागला असून, तिने पोलिसांना सुरक्षितता सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.

राजश्री याअगोदरही चर्चेत आली होती. मराठी भाषा लादण्याऐवजी स्थानिकांनी स्वतःची मेहनत करून स्थान मिळवावं, असं राजश्रीने म्हटलं होतं. स्थलांतरितांवर मर्यादा आणल्यास स्थानिक मराठ्यांची स्थिती बिकट होईल. या विधानांमुळे वर्सोवा येथील मनसे कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजश्रीने सोशल मीडियावरून हे व्हिडिओ काढून टाकले आणि सार्वजनिक माफी मागितली होती.

 

follow us