16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्यावा, शिष्टमंडळ अध्यक्षांच्या भेटीला

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. 16 आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. अध्यक्षांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे […]

Rahul Narvekar

Rahul Narvekar

आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. 16 आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले.

अध्यक्षांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे प्रकरण सोपवलं आहे, त्याबाबत लवकरात लवकर सुनावणी होईल, अशी आम्हाला खात्री असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.याआधी विधानसभेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिले होते.

आंबेडकरांनी नेमका कुठला थर्मामीटर लावलायं? नानांचा उपरोधिक सवाल

आजच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, शिवसेना ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, आमदार विलास पोतनीस, आमदार रवींद्र वायकर, आमदार रमेश कोरगावकर उपस्थित होते

Exit mobile version