दिल्लीसह (Delhi) तेलंगणा,(Telangana) गडचिरोलीमध्येही (Gadchiroli) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तेलंगणा राज्यातील कागजनगर, शिरपूर भागात 10 किमी अंतरावरील सीमा भागात भूकंपाचे (EarthQuake) सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाच्या या धक्क्याचे प्रवण केंद्र गोदावरी फौल्टमध्ये असून भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी आहे. तसेच 5 किमी खोल भूकंप झाला आहे.
विखे तुम्हा सगळ्यांना भारी पडतील; जयंत पाटलांचा BJPला इशारा, विखे खळखळून हसले
तर दुसरीकडे महाराष्ट्रालाही भूकंपाच्या धक्क्याने सोडले नसून गडचिरोली जिल्ह्यातील गोंडपिपरी आणि तर चंद्रपुरातील अहेरीतल्या महागावातही सौम्य धक्के जाणवले आहेत. अद्याप गडचिरोली प्रशासनाकडून या वृत्ताला दुजोरा दिला नसून अद्यापतरी नाशिक केंद्राकडून अधिकृत माहिती प्रसारित केली नसल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
तनपुरे साखर कारखान्यावर ‘प्रशासकराज’
मात्र, भूकंप पोर्टलकडून शिरपूर, कागजनगर भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याचं स्पष्टीकरण दिलंय.
तसेच गोदावरी फौल्टमध्ये भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती चंद्रपूरमधील अभ्यासक सुरेश चोपणे यांनीही सांगितले.
दिल्लीसह हरियाणा (Hariyana), पंजाब (Panjab), उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानामध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
दरम्यान, भूकंपाच्या या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीत न बाळगण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे.