तनपुरे साखर कारखान्यावर ‘प्रशासकराज’

तनपुरे साखर कारखान्यावर ‘प्रशासकराज’

राहुरी : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर (Dr. Baburao Bapuji Tanpure Cooperative Sugar Factory)आज प्रशासक मंडळ (Board of Directors) नियुक्त झाले. प्रशासकांनी कार्यभार स्वीकारल्याची माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष नामदेव ढोकणे (Namdeo Dhokane)यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राहुरीत खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay vikhe)यांच्या संपर्क कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उदयसिंह पाटील, सुरसिंग पवार, उपाध्यक्ष दत्तात्रय ढूस, रवींद्र म्हसे, महेश पाटील, उत्तम पाटील आढाव, मच्छिंद्र तांबे, अमोल भनगडे आदी यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी हे मुख्य प्रशासक असून त्यांना सहाय्यक म्हणून देविदास घोडेचोर, सहाय्यक निबंधक सहकारी प्रकाश सैंदाणे असे एकूण तीन सदस्य असलेल्या प्रशासक मंडळाने कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडून पदभार स्वीकारला.

‘आता राष्ट्र, नो महाराष्ट्र’, तावडे म्हणाले मला आता राज्यातील राजकारणात रस नाही

यावेळी नामदेव ढोकणे म्हणाले, कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत 16 जून 2021 ला संपली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक असणारा 32 लाख रुपयांचा निधी पुण्यातील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे भरण्याबाबत संचालक मंडळाला कळविण्यात आले होते. ही रक्कम अद्याप भरलेली नाही.

कारखान्याच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आलेली होती. ती रद्द करून प्रशासकीय मंडळ करण्यात यावे, या मागणीसाठी कारखाना बचाव कृती समिती हायकोर्टाच्या खंडपीठात गेलेली आहे. त्याबाबतची सुनावणी चालू असतानाच संचालक मंडळाकडून प्रशासकाकडे कार्यभार गेला आहे. हा कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या मालकीचा रहावा, हीच आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे.

परिवर्तन मंडळाने कारखाना बंद पाडलेला नाही. खासदार डॉ. सुजय विखे पाटील व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळांने सात वर्षे शेतकरी केंद्रबिंदू मानून कारभार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ आगामी निवडणूक लढविणार आहे, असे ढोकणे यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube