‘आता राष्ट्र, नो महाराष्ट्र’, तावडे म्हणाले मला आता राज्यातील राजकारणात रस नाही

मुंबई : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात सक्रिय दिसून आले नाही. यातच त्यांनी केलेल्या एका विधानांमुळे सध्या ते चर्चेत आहे. विनोद तावडे म्हणाले की मला यापुढे केंद्रातच काम करण्याची इच्छा आहे. आता राज्यात पुन्हा येण्याचा मानस नाही. तसेच तापुढे आता फक्त राष्ट्र, नो महाराष्ट्र अशा शब्दातच एकप्रकारे विनोद तावडे यांनी राज्यातील राजकरणात आता आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले.
फडणवीसांना बाजूला सारत तावडे मुख्यमंत्री बनणार का?
देवेंद्र फडणवीसांना बाजूला सारत विनोद तावडे हे मुख्यमंत्री बनणार का यावर विचारण्यात आले असता तावडे म्हणाले, या चर्चात अजिबात तथ्य नाही. महाराष्ट्रात भाजपा भाजप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), पंकजा मुंडे व इतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करत आहे. ही सगळी टीम असून यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम सुरु आहे.
खुनी दरोडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जेरबंद
मला आता राज्यातील राजकरणात काही रस नाही आहे. मी मनापासून सांगतो की मला केंद्राच्या राजकारणात काम करायचं आहे, असे तावडे म्हणाले. राज्यात अनेक वर्षे मी काम केलं आहे तसेच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माझी गरज भासल्यास मी तयार आहे. मात्र आज एक मराठी माणूस देशाच्या येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडतो आहे, याचा मला जास्त अभिमान आहे.
नवाब मालिकांची कन्या अजित पवारांच्या भेटीस, ‘या’ विषयवार झाली चर्चा
विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर मला हे काम करायला मिळतंय असं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. असे असले तरी महाराष्ट्राला जेव्हा गरज भासेल किंवा मला ते बोलावतील तेव्हा माझं सहकार्य नक्की देईल. मात्र माझे राजकारण हे केंद्रीय स्तरावरच राहील असे तावडे म्हणाले आहे. केंद्राच्या राजकारणात शिकायला खूप मिळतंय. पण राज्याला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मी नक्की सहकार्य करेन.