डोनाल्ड ट्रम्प यांना होऊ शकते अटक… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

डोनाल्ड ट्रम्प यांना होऊ शकते अटक… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

नवी दिल्ली : अमेरिकेचे (United States) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) हे काहींना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत राहत असतात. नुकतेच त्यांची फेसबुक व युट्युबवर एंट्री झाली होती. हे सगळं सुरु असतानाच ते एका प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहे. धक्कादायक म्हणजे ट्रम्प यांना या प्रकरणात अटक देखील होऊ शकते. 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला (Stormy Daniels) $ 130,000 पेमेंट केल्याच्या चौकशीच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ही कारवाई होऊ शकते. दुसरीकडे, ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अटकेबाबत आपल्याला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती.

काय आहेत ट्रम्प यांच्यावर आरोप?
2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल मीडियासमोर आली आणि म्हणाली की 2006 मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि तिच्यामध्ये अफेअर होते. ट्रम्प यांच्या टीमला याचा सुगावा लागला आणि त्यांचे वकील मायकल कोहेन यांनी स्टॉर्मी डॅनियल्सला या प्रकरणात माघार घेण्यासाठी तब्बल 1 लाख 30 हजार डॉलर दिले. डॅनियल्सला पैसे देणे बेकायदेशीर नव्हते, परंतु ज्या मार्गाने हे केले गेले ते बेकायदेशीर होते. ट्रम्प यांचे वकील कोहेन यांनी गुप्तपणे डॅनियल्सला ही रक्कम दिली.

आता या प्रकरणी ट्रम्प यांना अटक केली जाऊ शकते. दरम्यान ट्रम्प यांना अटक झाल्यास गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष असतील. त्याचवेळी ट्रम्प समर्थकांनी सोमवारी संध्याकाळी न्यूयॉर्कमध्ये निदर्शने केली. ट्रम्प यांनी निदर्शने केली तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते असा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

आधी लुटा मग शिक्षेविनाच सुटका, चोक्सीवरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

डॅनियल्स यांनीही ट्रम्प यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. एका रिपोर्टनुसार, 41 वर्षीय स्टॉर्मी डॅनियल्सने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला आहे. त्याचा खटला नंतर रद्द करण्यात आला. आता कोर्टाने म्हटले आहे की ट्रम्प यांना खटल्यादरम्यान डॅनियल्सने खर्च केलेले पैसे द्यावे लागतील. ट्रम्प यांच्यावर खटला भरल्यानंतर स्टॉर्मी डॅनियल्सने एक पुस्तकही लिहिले. ज्यामध्ये त्याने ट्रम्पसोबतच्या अफेअरबद्दल उघडपणे लिहिले होते

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube