Dapoli Resort Case : ईडीने फास आवळला! कदमांनंतर आणखी एकाला अटक

ED Arrest Sai Resort Case :  दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आणखी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी ईडीने माजी SDO जयराम देशपांडे यांना अटक केली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने ही दुसरी अटक केली आहे. याआधी ईडीने सदानंद कदम यांना या साई रिसॉर्ट प्रकरणी अटक केली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 14T174148.530

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 14T174148.530

ED Arrest Sai Resort Case :  दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आणखी एकाला अटक केली आहे. याप्रकरणी ईडीने माजी SDO जयराम देशपांडे यांना अटक केली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने ही दुसरी अटक केली आहे. याआधी ईडीने सदानंद कदम यांना या साई रिसॉर्ट प्रकरणी अटक केली आहे.

साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. ते 15 मार्च पर्यंत ईडीच्या कस्टडीत असणार आहेत. सदानंद कदम हे शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू आहेत.

Pune News : ठाकरे गटाला धक्का; फडणवीसांच्या उपस्थितीत ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश

सदानंद कदम यांना ईडीने 3 वेळा समन्स बजावले होते. परंतु एकदाही ते या चौकशीला हजर राहिले नाही, असे ईडीने न्यायालयात म्हटले आहे. साई रिसॉर्ट प्रकरण हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चिले जात आहे. याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांचे नाव देखील चर्चेत आले होते.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणी आरोप केले आहेत. अनिल परब यांनी माझा या रिसॉर्टशी काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी हे रिसॉर्ट अनिल परब यांचे नसून रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांचे असल्याचा आरोप  केला होता.

पेटलेलं पाणी ‘असं’ होईल शांत; फडणवीसांनी विधिमंडळात सांगितला मेगा प्रोजेक्ट, वाचा..

जयराम देशपांडे यांना हे रिसॉर्ट बांधण्याची परवानगी अनधिकृतपणे दिल्याने त्यांना ईडीने अटक केली आहे. 2022 मध्ये ईडीने ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना देखील चौकशासाठी बोलावले होते. हे रिसॉर्ट बांधताना केंद्रीय पर्यावरण खात्याचे नियम नजरेआड करण्यात आले असे पर्यावरण खात्याने म्हटले आहे.

Exit mobile version