Download App

मोठी बातमी : पत्राचाळ प्रकरणात राऊतांना मोठा धक्का; जवळच्या मित्राची 73.62 कोटींची मालमत्ता जप्त

मोठी बातमी : पत्राचाळ प्रकरणात राऊतांना मोठा धक्का; जवळच्या मित्राची 73.62 कोटींची मालमत्ता जप्त

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मुँबई ईडीने मोठी कारवाई केली असून, ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना मोठा झटका दिला आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने आज (दि.24) राऊतांचे कौटुंबिक मित्र प्रविण राऊत यांची 73.62 कोटींची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. आतापर्यंत पत्राचाळ घोटाळ्यात 116.27 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आज करण्यात आलेल्या कारवाईत ईडीने पालघर, दापोडी, रायगड आणि ठाणे येथील मालमत्ता जप्त केली आहे. (ED Mumbai  Attached 73. 62 Crore-Properties Of Pravin Raut In Patra Chawl Case)

 

प्रविण राऊतांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात पैसे

ईडीने आज कारवाई केलेले प्रविण राऊत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र असून, प्रविण यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात 55 लाख रुपये गेले होते. मात्र, हे पैसे 10 वर्षानंतर परत करण्यात आले. खात्यावर आलेले हे पैसे कर्ज रूपात घेतल्याचा दावा राऊतांच्या पत्नीने केला होता. त्यानंतर ईडीने राऊतांच्या मालमत्तेवरदेखील कारवाई केली होती.

सायलेंट व्होटर्सच्या काळजाला हात… मंगळसूत्र अन् संपत्तीवर बोलून मोदींनी निवडणूक फिरवली?

कोण आहेत प्रवीण राऊत?

प्रवीण राऊत संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळाशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशी सुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळाचे 90 कोटी रुपये हडपल्याचा आरोपही ईडीने केला आहे. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.

लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही; थेट ऑडिओ क्लिप ऐकवत पवारांचा मोदींवर हल्ला

पत्राचाळ घोटाळा नेमका काय?

गुरू आशिष बिल्डरने 2006 मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. त्यानंतर 2008 मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. मात्र, दहा वर्षंचा काळ उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प पूर्ण झाला नसल्याची बाब उघडकीस आली. एवढेच नव्हे तर, बिल्डरने मूळ 678 रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाला 1 हजार 34 कोटींचा चुना लावला. गुरूआशिष कंपनीच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 त्रयस्त बिल्डरांना FSI विकला आणि त्यातून 901 कोटी रुपये कमवले. तसंच रहिवाशांची घरंही बांधली नाहीत असं ईडीचं म्हणणं आहे.

follow us

वेब स्टोरीज