Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : महाविकास आघाडीची काल बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेते उपस्थित होते. तसेच या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देखील उपस्थित होते .
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीची बैठक काल शरद पवारांनी बोलावली होती. या बैठकीसाठी हे सर्व नेते उपस्थित राहिले होते. पण या बैठकीतील आसन व्यवस्थेवरुन शिंदे गटाने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाच्या नेत्या शीतम म्हात्रे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंची खुर्ची पुन्हा एकदा गेली.. महाभकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे अन्य दोन नेत्यांसोबत सोफ्यावर बसले होते. यापूर्वी त्यांना वेगळी खुर्ची असायची. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ती सुद्धा गेली!, असा खोचक टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.
उद्धव ठाकरेंची खुर्ची पुन्हा एकदा गेली..
महाभकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे अन्य दोन नेत्यांसोबत सोफ्यावर बसले होते. यापूर्वी त्यांना वेगळी खुर्ची असायची. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ती सुद्धा गेली!!🤣 pic.twitter.com/XLc6BlicJb— sheetal mhatre (@sheetalmhatre1) May 15, 2023
Nitesh Rane : ‘उद्धव ठाकरे सरदारांच्या रांगेत; स्पेशल खूर्चीचा प्रवास आता स्टुलाकडे’
तसेच शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील काल पत्रकार परिषेदमध्ये या विषयावर भाष्य केले होते. पूर्वी कोणताही मोठा नेता असला तरी तो मातोश्रीवर भेट घ्यायला यायचा. युतीची चर्चा करताना प्रमुख खुर्च्यांमध्ये उद्धव ठाकरेंना खुर्ची दिली जायची. पण आता त्यांना बाकीच्यांचा रांगेत बसवलं ते मनाला खटकलं, अशी प्रतिक्रिया देसाईंनी दिली होती.