संधी दिली तर कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करणार; प्रचार सभेत चैताली काळेंच मतदारांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निवडून देणे ही कोपरगाव शहराच्या विकासाची गरज आहे असं म्हणत, चैताली काळे यांना नागरिकांना आवाहन केलं.

  • Written By: Published:
News Photo   2025 12 16T195833.794

कोपरगावच्या लाडक्या बहिणींनी २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा (Election) निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांना भरभरून मतांनी निवडून दिलं. त्यातून उतराई होण्यासाठी कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहरदेखील इतर विकसित शहरांच्या बरोबरीने घेवून जायचं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या, असं चैतालीताई काळे म्हणाल्या आहेत. त्या प्रचारसभेत बोलत होत्या.

काकासाहेब कोयटे सामाजिक कामात व नेहमीच कोपरगावकरांच्या सुख-दुःखात सहभाग घेतात अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या काकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निवडून देणे ही कोपरगाव शहराच्या विकासाची गरज आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला द्या तुमच्या विकासाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हा बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे यांनी कोपरगाव शहरातील प्र.क्र.०५ मधील कॉर्नर सभेत नागरीकांशी संवाद साधतांना व्यक्त केला. यावेळी या कॉर्नर सभेला महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी चैतालीताई काळे म्हणाल्या की, कोपरगावच्या नागरीकांना हवा असलेला विकास आशुतोष काळे यांनी करून दाखवला हे कोपरगावकरांनी पाहीले आहे आणि नगरपालिकेची सत्ता नसल्यामुळे सर्वांगीण विकास करण्यासाठी येणाऱ्या अडचणीपण कोपरगावकरांनी पाहील्या आहेत. कोपरगाव शहराच्या विकासाच्या अनेक संकल्पना आ.आशुतोष काळे यांच्याकडे आहेत आणि या विकासाच्या संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून काकासाहेब कोयटे यांच्या रूपाने सक्षम, अभ्यासू आणि समाजाच्या सोबत असणारे नेतृत्व दिले आहेत.

कोयटेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, कोपरगावकरांच्या अपेक्षा पूर्ण करेल; आ. आशुतोष काळेंची ग्वाही

काका कोयटे यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी समता उद्योग मंदिर उभारून ठोस कृती केली आहे. या समता उद्योग मंदिराच्या माध्यमातून शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिलांना अगरबत्ती, मेणबत्ती, कापूर, दिव्यांच्या वाती अशा नागरीकांना लागणाऱ्या दैनंदिन वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देवून महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून दिले आहे असे आजवर केलेले अनेक सामाजिक उपक्रम कोपरगावकर पाहत आहेत अनुभवत आहेत.

महिलांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. महिलांसाठी उद्योग, स्वयंरोजगार आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याची खरी ताकद आशुतोष काळे यांच्याकडे आहे. कोपरगाव शहर आ.आशुतोष काळे यांच्या विकास दृष्टीतून समृद्ध होत आहे. कोपरगावच्या प्रत्येक घरात २३ दिवसांनी येणारे पाणी ४ दिवसांनी येत असून ते नियमित देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. चांगले रस्ते, स्वच्छ व सुंदर शहर, सक्षम आरोग्य सुविधा आणि सुरक्षित भविष्य देण्यासाठी कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बाहुमतासह सत्ता द्या असे आवाहन सौ.चैतालीताई काळे यांनी यावेळी केले.

कोपरगावच्या लाडक्या बहिणींना स्वच्छ पाणी, स्वच्छ परीसरा बरोबरच आरोग्याच्या सुख सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून पुरवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून उद्योग मंदिर उभारून त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. महिला नेहमीच कुटुंबाला योग्य दिशा देण्याचे काम करतात. महिला ज्या पद्धतीने आर्थिक बचत करून घर सांभाळतात त्या महिला स्वतःचा उद्योग व्यवसायपण समर्थपणे सांभाळू शकतात याचा मला विश्वास आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा आमचा निर्धार आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.

follow us