Eknath Khadase Son in law Pranjal Khevalkar bail in professed Pune Drugs Party Case : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे. कारण रोहिणी खडसे यांचे पती आणि खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर झाला आहे. ते पुण्यातील एका कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी गेल्या 2 महिन्यांपासून अटकेत होते.
सुबोध भावे दिसणार नव्या बायोपिकमध्ये, हिंदीत साकारणार नीम करोली बाबांची भूमिका!
पुण्यामध्ये असलेल्या खराडी भागामध्ये पोलिसांनी एका ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या विरूद्ध पुरावे सापडल्याचं सांगण्यात येत होतं. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. मात्र आता तब्बल 2 महिन्यांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.