Download App

‘मदत करनेवाला बडा होता है, तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर…’; खडसेंचा मुख्यमंत्र्यांना फोन

  • Written By: Last Updated:

Eknath Khadse : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यांना रविवारी रात्री उशिरा रुग्णालयात हलवलं होतं. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली होती. दरम्यान, बॉम्बे रग्णालयात सर्व तपासण्या केल्यानंतर खडसेंच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फोन करून मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तुमचं विमान वेळेवर आलं नसतं तर माझं विमान टेक ऑफ झालंच नसतं, असं ते म्हणाले.

Shah Rukh Khan: किंग खानने चाहत्यांना दिलं खास गिफ्ट; दिवाळीच्या मुहूर्तावर ‘डंकी’चं नवं पोस्टर रिलीज 

एकनाथ खडसे यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची तब्येत चांगली आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे फोन करून आभार मानले. मुख्यमंत्र्यांशी बोलतांना खडसे म्हणाले, खरंतर विषय छोटाच होता. आपल्या दृष्टीकोनातून फार मोठाही नव्हता. मला एअर अॅम्ब्युलन्स सापडली नाही. एक मिळाली होती, ती एअर अॅम्बुलन्स नाशिकला उभी होती. मात्र, एटीसी क्लिअरन्स मिळत नव्हता. तुम्ही बोलल्यामुळं तुम्हाला लवकर मिळाली. मी रुग्णालयात आलो, असं खडसे म्हणाले.

Vicky Kaushal : विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर 

ऑपरेश थिएटरमध्ये नेलं तेव्हा अँजिओप्लास्टीचा निर्णय घेण्यात आला. दोन ब्लॉकेज 100 टक्के आणि तिसरे 70 टक्के होता. परिस्थिती गंभीर होती. त्यामुळं अँजिओप्लास्टी करण्यात आली. ऑपरेशन व्यवस्थित झालं. कार्डिअॅक अरेस्ट आला. हृदय 100 टक्के बंद पडलं होतं. त्यावेळी दोन मिनिटांची शॉक ट्रीटमेंट देण्यात आली. जर तुमचे विमान वेळेवर आले नसते तर माझे विमान टेकऑफ झाले असते आणि कधीच लॅंड झालं नसतं. मदत करनेवाला बडा होता है. तुमचे आभार, असं म्हणत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यावेळी खडसेंनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

काल खडसे यांचा रुग्णालयातील पेपर वाचतांनाचा फोटो समोर आला होता. खुद्द खडसेंनीच हा फोटो शेअर करत आपली तब्येत ठणठणीत असल्याचं सांगितलं होतं. खडसेंनी लिहिलं होतं की, मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे माझी प्रकृती आता चांगली आहे. मी लवकरच पूर्णपणे ठणठणीत बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईन. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहता. आफले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनिंनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, अशी पोस्ट खडसेंनी लिहिली होती.

Tags

follow us