Vicky Kaushal : विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर

Vicky Kaushal : विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केलं जाहीर

Raj Thackeray on Vicky Kaushal as Sambhaji Maharaj : मनसेकडून (MNS) दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शिवाजी पार्कात दीपोत्सावाचे आयोजन करण्यात आला आह. या दीपोत्सवाच्यावेळी अनेक सेलिब्रिटी आपली हजेरी लावत असतात. यंदा विकी कौशल, राजकुमार हिराणी, अभिजीत जोशी, साजिद नाडियादवाला, आशुतोष गोवारीकर या सेलिब्रिटींनी हटक्या अंदाजात हजेरी लावली होती.

दरम्यान विकी कौशल  (Vicky Kaushal) त्याच्या आगामी सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारताना बघायला मिळणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याबद्दल मोठी घोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)


मनसेच्या दीपोत्सवाकार्यक्रमात राज ठाकरेंनी विकी कौशलचं तोंडभरून कौतुक केल्याचे दिसत आहे. त्यावेळी विकीच्या लूकबद्दल बोलत असताना ते म्हणाले की,”विकी कौशलचा एक नवा सिनेमा लवकरच चाहत्याच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विकी कौशल धर्मवीर संभाजी महाराज यांची भूमिका साकारताना बघायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी तो खूप मेहनत घेत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं आहे. तसेच त्याने खरीखुरी दाढी वाढवल्याचे पाहायला मिळाले आहे”.

विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. परंतु अद्याप या सिनेमाचं नाव नेमकं काय आहे याची माहिती देखील देण्यात आली आली आहे. विकीच्या आगामी सिनेमाचे नाव ‘छावा’ असे असणार आहे. या सिनेमात विकी कौशलसह बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता आणि अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सिनेमातील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अनिल कपूरच्या (Anil Kapoor) नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Mr And Mrs Mahi: जान्हवी अन् राजकुमारच्या ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ ची रिलीज डेट ढकलली पुढे

विकी कौशल सध्या ‘सॅम बहादुर’ या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. मेघना गुलजार यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर आणि पोस्टर आऊट झाल्याने चाहते आता या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. ‘सॅम बहादुर’ या सिनेमात नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक, रिचर्ड भक्ती क्लेन, साकिब अयुब आणि कृष्णकांत सिंह बुंदेला मुख्य भूमिकेत बघायला मिळत आहेत. विकीचा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा सिनेमादेखील 22 सप्टेंबर दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. उरी, मसान, राझी, संजू, सरदार उधम, मनमर्जियां, जरा हटके जरा बचके अशा अनेक सिनेमांत विकीच्या अभिनयाची जादू कायम बघायला मिळाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube