Download App

सर्वांना CD ऐवजी ED आठवते, आता ED चे राज्य, खडसेंच्या राज्य सरकारला टोला

  • Written By: Last Updated:

ज्यावेळी एकनाथ खडसे यांनी भाजपला राम – राम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रेवेश केला. त्यावेळी त्यांचा एक डायलॉग खूप फेमस झाला होता. तो म्हणजे तुमच्याकडे ED असेल तर माझ्याकडे पण CD आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पुन्हा याच वाक्याचा  पुनुरूच्चार केला. पहिले माझं नाव ऐकलं की सर्वांना CD आठवत होती मात्र, आता सर्वांना ED आठवते असं म्हणत अलीकडे ED चे राज्य अस्तित्वात आल्याचे म्हणत खडसेंनी नाव न घेता शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केले. (Eknath Khadse’s criticism of the state government)

मी पक्षात नवीन आहे. पण गेल्या चाळीस वर्षात शारद पवार यांच्या जवळ काम करण्याची संधी मिळाली. एकमेकान समजून घेण्याच राजकारण होत.असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले आता राजकारणाचा स्तर खालावतो आहे. ईडी च्या माध्यमातुन मानसं गोळा केली जात आहेत.

महागाई, बरोजगारीवरुन खासदार कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

देशातील आणि राज्यातील सरकार हे नेत्यांना भीती घालते त्यांना ब्लॅकमेल करते असा आरोप यावेळी खडसेंनी केला. आमच्या विरोधात बोलला की लगेच त्याचा मागे ED लावली जाते. असा प्रकारचं राजकारण सध्या देशात सुरु आहे. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी याच्या कडून लोकांचे लक्ष हे सरकार हिदुत्वाकडे वळवत आहे. यांना असे वाटते देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आहे. परंतु हे दोघे अमरत्व घेऊन आले आहेत का? असा सवाल तयावेळी खडसेंनी उपस्थित केला.

गद्दारी करायची असती तर राज ठाकरेसोबत केली असती, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल

पुढे राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल खडसे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस असा एकमेव पक्ष आहे जो स्थापन झाल्यापासून 15 सलग सत्तेत राहिलेला पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात अनेक प्रकल्प आणले अनेक आमूलाग्र बद्दल या पक्षाने राज्यात घडून आणले. अनेकांनी हा पक्ष मोठा केला. आणि आता आपल्याला सर्वांना मिळून हा पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष करायचा आहे.

Tags

follow us