महागाई, बरोजगारीवरुन खासदार कोल्हेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
Amol Kolhe On Central Government : अहमदनगरला होणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP)रौप्य महोत्सवी वर्धापन दिन (NCP Anniversary)आज मुंबईत (Mumbai)सुरु आहे. मुंबईमधील माटुंगा परिसरातील षण्मुखानंद हॉल येथे सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नवीन संसदेच्या (New Parliaments)उद्घाटनावेळी राजदंड बसवण्यात आला, त्यावरुन केंद्र सरकारसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने 25 व्या वर्षात पदार्पण केलं आहे, म्हणजे आपली जबाबदारी अधिक वाढली असल्याचं यावेळी सांगितले. केद्र सरकारकडून महागाई बेरोजगारी हे महत्वाचे विषय सोडून नको त्या गोष्टींकडेच केंद्र सरकार लक्ष केंद्रीत करत असल्याची घणाघाती टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.
दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात साकारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती
यावेळी खासदार कोल्हे म्हणाले की, मावळ्यांशिवाय महाराज नसतात आणि त्याशिवाय स्वराज्य उभा राहात नाही तर त्याप्रमाणे राष्ट्रवादीची धुरा खांद्यावर घेऊन गेलं अव्याहतपणे पाव शतक वाटचाल करणारे आपण सर्वजण, खरंतर येण्यास थोडा उशीर झाला, आपल्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी सांगितलेल्या चहाचा आस्वाद घेत होतो, नाही आजकाल चहा थोडा वेगळा का बनतो असं म्हणतात, मग त्याच्यामध्ये त्यांना विचारलं की, धनुभाऊ या चहाला एवढा वेळ का लागतो? त्यावर त्यांनी सांगितलं की, त्याच्यात त्यांनी सांगितलं की, त्याच्यात प्रसिद्धीचं दूध असतो, उद्योजकांची चहापत्ती असते, त्याच्यामध्ये आर्थिक सगळी साखर टाकली जाते आणि त्याच्यानंतर हा चहा बनतो, त्याच्यामुळे आजकाल चहाला थोडा वेळ लागतो असा टोलाही यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला.
International Yoga Day: सेलिब्रिटींनी असा साजरा केला योग दिवस, सोशल मिडीयावर Video Viral
खासदार कोल्हे म्हणाले की, सर्वसाधारणपणे असं म्हणतात की, जेव्हा पंचवीशीचं वय येतं त्यानंतर आपल्या सर्वसाधारण कुटुंबामध्ये सांगतात की, आता आणखी जबाबदारी वाढलीय. ही जबाबदारी देशपातळीवर आपण जेव्हा विचार करतो, देशाच्या वातावरणाचा जेव्हा विचार करतो, तेव्हा ती का वाढल्यासारखी वाटते? म्हणून मघाशी उल्लेख करुन देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा उल्लेख केला आणि अवघ्या काही दिवसांपूर्वी आपण देशाच्या नवीन संसदेचं उद्घाटन होताना आपण पाहिलं तेव्हाचा एक प्रसंग खरोखर कुठेतरी काळजाला लागून गेला.
त्यावेळी एक राजदंड आणण्यात आला आणि त्या राजदंडाचं खूप मोठं स्तोम माजवण्यात आलं, त्यावेळी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली. कारण तोपर्यंत प्रत्येक हिंदूस्तानातला प्रत्येक राजा जेव्हा राज्याभिषेक करुन घ्यायचा त्यावेळी तो राजा शपथ घ्यायचा की माझा राजदंड मी माझ्या धर्मगुरुंच्या हातात देतो आणि माझ्याकडून काही अनुचित प्रकार घडला तर माझा धर्मगुरु माझ्या मस्तकावर या राजदंडाचा प्रहार करुन मला पदावरुन काढून टाकेल.
याचा अर्थ वर्षानुवर्ष धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर बसलेली होती, ही धर्मसत्ता राजसत्तेच्या डोक्यावर बसलेली असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचं 350 वं वर्ष सुरु झालंय म्हणून आपण साजरं करतोय ही सामाजिक क्रांती लक्षात घेतली तर छत्रपती शिवाजी महाराज हे शतकांमधले पहिले राजे होते, ज्यांनी राजदंड हा धर्मगुरुच्या नाही तर तो स्वतःच्या हातात ठेवला होता.
बरं हा राजदंड हातात ठेवण्याचं कारण काय होतं? तर धर्मसत्ता आणि राजसत्ता ही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लोककल्याणाचं काम करतील, यासाठी हा राजदंड हातात होता. ज्यावेळी नवीन संसदेच्यावेळी राजदंडाचं स्तोम पाहायला जातं त्यावेळी खरोखर हा विचार करावा लागतो की, आता लोककल्याणाचा विचार कोण करतंय, असा सवालही यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.