रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक, एकनाथ शिंदेंची नाव न घेता भाजपवर टीका 

Eknath Shinde On BJP  : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपकडून होत असलेल्या फोडाफाडीच्या राजकाणामुळे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही

Eknath Shinde On BJP

Eknath Shinde On BJP

Eknath Shinde On BJP  : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपकडून होत असलेल्या फोडाफाडीच्या राजकाणामुळे नाराज असल्याची चर्चा गेल्याकाही दिवसांपासून राज्यातील राजकारणात सुरु आहे. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे आज एकनाथ शिंदे यांनी नगरपरिषद (Nagar Parishad) आणि नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) निवडणूक सभेत बोलताना नाव न घेता शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे. डहाणूत आपण अहंकाराविरोधात एकत्र आलोय, रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती असं या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, डहाणूमध्ये आपण सगळे अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत. अहंकारामुळे रावणाची लंकाही जळून खाक झाली होती. आता 2 डिसेंबरला तुम्हाला तेच काम करायचं आहे असं या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच लाडक्या बहिणांचा चमत्कार तुम्ही या आधी विधानसभेला पाहिला आहे. तुम्ही जर ठरवलं तर कुणीही आला तरी आपला विजय रोखू शकणार नाही असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता भाजपवर पहिल्यांदाच टीका केल्याने भाजप या टीकेला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  तर दुसरीकडे पालघरच्या डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि भारतीय जनता पक्षात थेट लढत होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये नगराध्यपदासाठी थेट निवडणूक होत आहे.

भारताला धक्का, पहिल्याच दिवशी आफ्रिकेची शानदार कामगिरी; 6 विकेट गमावून केल्या 247 धावा

राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदार होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

Exit mobile version