DCM Eknath Shinde in Ahilyadevi Holkar Jayanti : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं काम आदर्श घेण्यासारख आहे. आज आपण अनेक सुना-बाळांचा छळ होताना पाहतो. मात्र, चूक झाली तर आपल्या मुलालाही शिक्षा देण्यासाठी पुढं आलेल्या आहिल्यादेवी आपल्याला आठवतात. कारण, ती सून जरी असली तरी ती सुद्धा कुणाची तरी मुलगीच असते. (Holkar) त्यामुळे सर्वांनी सुनेचाही आपल्या मुलीसारखाच सन्मान करावा. तीच खरी आहिल्यादेवी होळकर यांना श्रद्धांजली ठरेल असं प्रदिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमीत्त बोलत होते.
लाडकी बहीण योजना बंद होणार का?
आज जे लोक आपल्या सुनांचा छळ करतात त्या प्रवृत्तींना ठेचून काढलच पाहिजे. कारण, अशा लोकांची गैर केली तर आपल्या लेकी-बाळी सुरक्षीत राहणार नाहीत असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले, विरोधक वारंवार लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. मात्र, तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही कधीही लाडकी बहीण योजना बंद करणार नाहीत. तसंच, आम्ही प्रिंट मिस्टेकवाले सरकार नाहीत असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.