Download App

एकनाथ शिंदे कोणताही डाग नसलेले राजकारणी; नाना पाटेकरांकडून शिंदेंवर स्तुतीसुमनं

Eknath Shinde हे ज्यांच्यावर कोणताही डाग नसलेले असे राजकारणी आहेत. असं म्हणत नाना पाटेकर यांनी त्यांच्यावर स्तुतीसमन उधळले आहेत.

Eknath Shinde is a politician without any blemish; Nana Patekar praises Shinde : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे नेहमीच विविध राजकीय नेत्यांवर किंवा राजकारणावर टीकाटिप्पणी करताना दिसत असतात. त्यावेळी देखील त्यांनी अशाच प्रकारे राजाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. एकनाथ शिंदे हे ज्यांच्यावर कोणताही डाग नसलेले असे राजकारणी आहेत. असं म्हणत नाना पाटेकर यांनी त्यांच्यावर स्तुतीसमन उधळले आहेत.

नेमकं काय म्हणाले नाना पाटेकर?

नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशन , टाटा मोटर्स आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमान कोयना धरण परिसरात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवली जात आहे. त्याचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यापासून ओळखतो, आमची जुनी मैत्री आहे, तसेच ते त्या काही राजकीय नेत्यांपैकी आहेत. ज्यांच्यावर कोणताही डाग नाही. तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद देखील भूषवलं. पण त्यांच्याकडे कोणीही बोट दाखवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांना देखील मी जवळून ओळखतो. त्यांचं देखील काम चांगलं आहे. असेही यावेळी पाठकऱ्यांनी नमूद केलं.

Pakistani Ranger : बीएसएफची मोठी कारवाई, राजस्थान सीमेवर पाकिस्तानी रेंजर ताब्यात

तर यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे. नाम फाउंडेशन हे सध्या राज्यभर काम करत आहे. यामध्ये चिपळूण, महाड, खेड या ठिकाणी त्यांनी प्रभावी काम केले आहे. त्यामुळेच कोकणामध्ये पुराची तीव्रता कमी झाल्याचं पाहायला मिळाले. त्यानंतर आता कोयना धरण आणि बॅकवॉटर परिसरात देखील सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. नाम फाउंडेशन च्या कामाची व्याप्ती वाढत चालली आहे. तसेच धरणाचा गाळ काढणे. हे अत्यंत आवश्यक झाले असून त्यावर कॅबिनेटमध्ये देखील चर्चा झाली. त्यामुळे नाम फाउंडेशनच्या सोबत शासन देखील या कामात उतरलं आहे.

follow us