पुण्यात सध्या जैन बोर्डिंग प्रकरण चांगलंच तापलय. (Pune) शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. विशेष म्हणजे त्यांनी धंगेकर यांनी येत्या 27 ऑक्टोबर 2025 रोजीपासून जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी भाजपाच नेते तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा या खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी धंगेकर यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
शिंदे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. जैन बोर्डींगच्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केले. धंगेकर यांना तुम्ही काही सल्ला दिला आहे का? असे विचारताच, मी त्यांना सांगितलं आहे की आपल्याला महायुतीमध्ये दंगा करायचा नाही. मी आता तो (जैन बोर्डिंगचा) विषय संपलेला आहे. धंगेकर यांना ज्या काही गोष्टींची माहिती मिळाली, त्यावरून ते बोलत होते, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तसंच आपली महायुती आहे. आपल्याला विरोधकांच्या हातात कुठलेही कोलित द्यायचं नाही, असा सल्लाही धंगेकर यांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितलं.
