Pune News : पतीच्या डोक्यात संशयाचं भूत; पत्नीने ऐन दिवाळीतच काढला काटा…

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांचा त्यांच्याच पत्नीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीयं.

Murder News

Pune News : पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर (Nakul Bhoir) यांची त्यांच्याच पत्नीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीयं. नकुल भोईर हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. मागील अनेक वर्षांपासून ते पुण्यात सामाजिक कार्य करीत असत. आपल्या पत्नीवर ते संशय घेत असल्याने पत्नीने त्यांची कापडाने गळा आवळून हत्या केल्याची माहिती समोर आलीयं.

आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही कितीही कट कारस्थानं करा…, धंगेकरांचा जैन बोर्डिंग प्रकरणात मोठा दावा

येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार होत्या. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी नकुल भोईर यांच्याकडून आपल्या पत्नीची सुरु होती. त्यांना आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचं होतं, मात्र, त्याआधीच पत्नी चैताली भोईर हिने पतीला संपवलंय.

बातमी अपडेट होतेयं…

follow us