Eknath Shinde on Aditya Thackeray for restriction on MP : अदित्य ठाकरे यांनी खासदारांना कुणाला भेटायचं? त्याचबरोबर कुणासोबत डिनरला जायचं? यावर पक्षाशी चर्चा करायला सांगितलं आहे. म्हणजे त्यांनी कुणी काय खावं? कुणी काय बोलावं? यावर एक प्रकारे बंधन आणले आहेत.असं शिंदे म्हणाले. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या (Eknath Shinde) नेत्यांमध्ये सतत वाद सुरू आहे.
Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’ चा टिझर
दरम्यान, शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज दिल्लीत पोहोचले. तिथे त्यांनी पक्षाच्या खासदारांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी खासदारांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा संदेश दिला आणि सल्लाही दिला. त्यावरून शिंदेंनी अदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
जे राहिलेत ते पण येतील; साळवींनंतर ठाकरे गटाला आणखी गळतीचे शिंदेंकडून संकेत
अदित्य ठाकरे यांनी खासदारांना कुणाला भेटायचं? त्याचबरोबर कुणासोबत डिनरला जायचं? यावर पक्षाशी चर्चा करायला सांगितलं आहे. म्हणजे त्यांनी कुणी काय खावं? कुणी काय बोलावं? यावर एक प्रकारे बंधन आणले आहेत. चांगलं आहे. त्यांनी एक प्रकारे मेनू कार्ड तयार केलं आहे. मात्र बाळासाहेब असे नव्हते. ते अत्यंत मोठ्या मनाचे होते. ते अशाप्रकारे कुणावरही बंधन आणत नव्हते. असं म्हणत शिंदेंनी अदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते अदित्य ठाकरे?
शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज दिल्लीत पोहोचले. तिथे त्यांनी पक्षाच्या खासदारांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी खासदारांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा संदेश दिला आणि सल्लाही दिला. यावेळी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला जाण्यास मनाई केलीय.
Manipur President Rule : मोठी बातमी! मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
शिंदेंच्या खासदारांच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहू नका. कुठेही जायचं असेल तर अगोदर पक्षाची परवानगी घ्या, अशी तंबी आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी खासदारांना पक्षाला माहिती न देता कोणत्याही जेवणाच्या किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नका. एनडीए नेत्यांपासून, विशेषतः एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांपासून अंतर ठेवा, असं सुनावलं आहे. यासोबतच त्यांनी खासदारांना पक्ष शिस्तीचं पालन करण्यास सांगितले.