धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना एकनाथ शिंदे घेणार PM मोदींची भेट

Eknath Shinde and PM Modi : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत

Eknath Shinde And PM Modi

Eknath Shinde And PM Modi

Eknath Shinde and PM Modi : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासबोत ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे सहा खासदार देखील आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, आज पंतप्रधान मोदी एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे गटातील सहा फुटीर खासदारांसह टीएमसीमधील 20 फुटीर खासदारांसोबत नाश्ता करणार आहेत. त्यामुळे या भेटीत पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिल्याने या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. गेल्या दोन दिवसांत ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. या युक्तिवादानंतर ठाकरे गटाच्या बाजूने देखील निर्णय लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मोठी बातमी! भाजप नेते विजय चौधरी यांना अटक ; ऑडिओ क्लिपप्रकरणात कारवाई –

6 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावाणी दरम्यान युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी 2018 च्या शिवसेना पक्षाच्या घटनेचा उल्लेख केला. यावेळी कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी न्यायालयाला माहिती दिली की, 2018 साली झालेल्या बैठकीत एकमताने उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. तर एकनाथ शिंदे यांना पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली होती. तसचे निवडणूक आयोग पक्षाची घटना कशी नाकारु शकतात असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना उपस्थित केला.

Exit mobile version