शिवसेना–भाजप युती ही सत्ता किंवा परिस्थितीजन्य नाही. (Election) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी विचारधारेवर ही युती घडवली आहे. त्यामुळे ही युती जुनी आणि मजबूत आहे. ही युती तुटणार नाही, सदैव कायम राहील असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. ते नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते.
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच एक विधान केले होते. युती किमान २ डिसेंबरपर्यंत तरी टिकायला हवी, असं ते विधान होतं. या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला होता. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वादानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, शिंदे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. न्यायालयाने निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सुनावणी पूर्ण करत निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? रवींद्र चव्हाण म्हणाले, 2 तारखेपर्यंत युती टिकवायची अन्
निवडणुकांबद्दलच्या निर्णयावर शिंदे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नेमका काय आहे याचा अभ्यास करूनच अधिकृत भूमिकेची घोषणा करू. मात्र आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो. राज्यातील निवडणूक प्रक्रिया, ओबीसी आरक्षणाचा विषय आणि युतीतील अंतर्गत मतभेदाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर निकाल महत्त्वाचा आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार कार्यरत आहे. आमची युती फार पूर्वीपासून एका विचारावर काम करत आहे. ही युती कायम राहिल असंही शिंदे म्हणाले आहेत.
🗓️ 28-11-2025 LIVE इगतपुरी, नाशिक 📹 पत्रकारांशी संवाद (Deferred Live)
https://t.co/MHvLdz54lD— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 28, 2025
