Download App

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी महाराष्ट्रात मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलायं.

Election Commission : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष तयारी करीत असल्याचं चित्र आहे. प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हालचाली करीत आहेत. यासोबतच माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश करुन घेत आहेत. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) मोठा निर्णय घेण्यात आलायं. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याच्या तयारीत आहे.

रोहित पवारांचा अजित पवारांकडे कल, त्यांनी त्यांच्या पक्षात जावं; अंजली दमानियांचा खोचक टोला

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद घेतलीयं. या परिषदेत देशातील मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी केंद्रीय आयोगाकडून आढावा घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे बिहारमध्ये मतदार याद्यांच्या फेरतपासणीवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांवरुन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आयोगाकडून उत्तरही देण्यात आलं होतं.

मोठी बातमी! पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, बंडू अंदेकरच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एक महत्वाची परिषद घेतलीयं. या परिषदेमध्ये मतदार याद्यांची फेरतपासणीची तयारी कुठपर्यंत आलीयं, याबाबतचा आढावा घेण्यात आलायं. तर प्रत्यक्ष विशेष मतदारयादी परिक्षण कधी राबवलं जाऊ शकतंय याबाबतची माहिती घेण्यात आलीयं.

निवडणूक आयुक्तांच्या परिषदेत महत्वाचे निर्देश…
-1200 पेक्षा अधिक मतदार एका मतदान केंद्रावर नसतील याची काळजी घेण्याबाबतच्या सूचना
-महाराष्ट्रात नवे मतदार पोलिंग स्टेशन तयार होण्याची शक्यता
-निवडणुकीआधी मतदारयादीची सखोल फेरतपासणीची शक्यता…

follow us