एम.सी.ए., व्यवस्थापनशास्त्र अन् अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी रोजगार मेळावा

सकाळी 9:00 ते 5:30 या वेळेत डी. वाय. पाटिल इन्स्टिट्युट ऑफ मास्टर ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन अँड मॅनेजमेन्ट आकुर्डी येथे मेळावा होणार आहे.

Untitled Design 31 2

Untitled Design 31 2

Employment fair on Friday : डॉ. डी. वाय. पाटिल इन्स्टिट्युट ऑफ मास्टर ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन अँड मॅनेजमेन्ट आकुर्डी, पुणे यांच्या वतीने आणि टॅलेंनलीओ च्या सहकार्याने “महा रोजगार मेळावा 2026” चे आयोजन करण्यात आले आहे. एम.सी.ए., व्यवस्थापनशास्त्र आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी करिअर संधी आहे.

हा रोजगार मेळावा शुक्रवार, 22 मे 2026 ला सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:30 या वेळेत डी. वाय. पाटिल इन्स्टिट्युट ऑफ मास्टर ऑफ कॉम्पुटर अँप्लिकेशन अँड मॅनेजमेन्ट आकुर्डी येथे होणार आहे.

या मेळाव्यामध्ये कोण सहभागी होऊ शकत?
• एम.सी.ए. विद्यार्थी
• व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थी
• अभियांत्रिकी विद्यार्थी (सर्व शाखा)

या रोजगार मेळाव्याची वैशिष्ट्ये
• महाराष्ट्रातील 30 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांच्या एच.आर. प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 2025, 2026 आणि 2027 पासआऊट बॅचसाठी तांत्रिक आणि गैरतांत्रिक क्षेत्रातील पूर्णवेळ नोकरीच्या संधी उन्हाळी आंतरवासिता (इंटर्नशिप) तसेच पूर्ण-वेळ नोकरीची माहिती. 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या टॅलेंट पूलमध्ये सहभागी होऊन स्वतःची क्षमता सादर करण्याची संधी

सहभाग नोंदणी
सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

🔗 नोंदणी लिंक : https://app.talenlio.com/f/jobfair20206

सोबत काय आणाल?
• महाविद्यालय ओळखपत्र
• शासनमान्य ओळखपत्र
• पोर्टफोलिओ / प्रकल्प अहवाल (असल्यास)

Exit mobile version