Download App

अजित पवारांचं बंड सत्तेसाठी पण शरद पवार कुणालाही माफ करत नाही; शालिनीताई पाटलांचा इशारा

Shalinitai Patil on Sharad Pawar : शरद पवार हे धुर्त राजकारणी आहेत. ते अजित पवारांच्या बंडाचा योग्य तो हिशेब 2024 पूर्वीच चुकता करतील असा इशार दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार आणि त्यांच्या गटाला दिला आहे. त्यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली त्यावेळी त्या अजित पवारांच्या बंडावर होत्या. ( EX CM wife and minister Shalinitai Patil said to Ajit Pawar Sharad Pawar never forgive anyone )

Vidula Chougule: दहावीत असतानाच मिळाली मालिकेत काम करण्याची संधी; अन् सिद्धीचा ‘जीव झाला येडा पिसा’

पुढे शालिनीताई असं देखील म्हणाल्या की, वसंतदादा पाटील यांच्या काळात शरद पवारांनी केलेल्या बंडामागे एक विचार होता. पण अजित पवारांच्या बंडामागे कोणताही विचार नाही. त्यांना केवळ सत्ता आणि गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी संरक्षण हवं आहे. मात्र त्यांची ही चाल फार काळ चालणार नाही. असं शालिनीताईंनी म्हटलं.

अजित पवारांनी कोणाचा पोपट मारला हे सिध्द; उदय सामंतांचा ठाकरे गटाला टोला

त्याचबरोबर त्यांनी यावेली अजित पवारांना सल्ला देखील दिला आहे. की, राजकारणातील एक ज्येष्ठ म्हणून माझा अजित पवारांना सल्ला आहे. त्यांनी ऐकावा की नाही त्यांच्या हातात आहे. पण त्यांनी चूक केली आहे. ते भाजपच्या आश्रयाला गेले आहेत. पण लोकशाहीत असं चालत नाही. परिस्थिती बदलते सत्य हे सत्यच असते.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी पक्षबांधणीचा कार्यक्रम हाती घेतला असून ते महाराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यातील आजच्या पहिल्या दिवशी ते छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील येवला या मतदारसंघात गेले होते. त्या अगोदर त्यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटले की, अजित पवारांना मंत्री, चारदा उपमुख्यमंत्री केलं. मात्र सुप्रियाला कधीच कोणत पद दिलेलं नाही. केंद्र सरकारमध्ये पक्षाला मंत्रीपद मिळालं होतं. तेव्हा देखील मी सुप्रिया खासदार असतानाही तिला ते दिलं नाही.

Tags

follow us