अजित पवारांनी कोणाचा पोपट मारला हे सिध्द; उदय सामंतांचा ठाकरे गटाला टोला

अजित पवारांनी कोणाचा पोपट मारला हे सिध्द; उदय सामंतांचा ठाकरे गटाला टोला

Uday Samant : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडाताहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीत (NCP) बंड केल्यानं राज्यातील समीकरणेच बदलली. त्यानंतर आता ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटातील आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला. त्यामुळे शिंदे गटाच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय लवरकरच होण्याची चिन्ह दिसत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितल्याप्रमाणे शिंदे गटाचा पोपट मेला आहे, याची नार्वेकरांकडून फक्त घोषणा बाकी आहे, अशी प्रखर टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली. त्यांच्या याच टीकेला आता उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. (Uday Samant On Arvind Sawant Whose parrot was killed by Ajit Pawar)

https://www.youtube.com/watch?v=RhZq-lPLC0s

उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आता ही केस विधानसभा अध्यक्षांसमोर चालवावी असं न्यायालयाने सांगितलं. तशी नोटीस बजावण्यात आली. त्यानुसारच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यासंदर्भात आपला निर्णय देणार आहेत. आम्ही आमची न्याय बाजू विधानसभेच्या अध्यक्षांसमोर 40 जण मांडू. मात्र, आमचा पोपट मेलेला नाही. तर अजित पवार महायुती सोबत येऊन त्यांनी कोणाचा पोपट मारला, हे सिद्ध झालं असा खोचक टोला सामंत यांनी लगावला.

ते म्हणाले, शिंदे गटाचा पोपट मेला ही अशी वक्तव्यं केवळ आपल्या सोबत जे आहेत, ते टिकावे यासाठी चाललेला हा प्रयत्न ठाकरे गटाचा आहे. पोपट मारण्याच्या अनेक तारखा देऊन झालेल्या आहेत, मात्र पोपट काही मेलेला नाही. जे सगळं चाललय ते कार्यकर्त्यांना माँरल सपोर्ट देण्यासाठी सुरू आहे, असं उदय सामंत म्हणाले.

World Cup 2023 : पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार? शाहबाज शरीफ यांची घोषणा 

शरद पवारांचा आज पासून राज्यव्यापी दौरा सुरू झाला. याविषयी सामंत यांना विचारले असता, ते म्हणाले, शरद पवार हे 56 वर्ष देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत त्यामुळं त्यांना मानणारा वर्ग राज्यात आहे. मात्र, अजित पवार नंबर घेऊन महायुती सोबत आलेले आहेत. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. खरंतर हे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद आहेत. मात्र, शरद पवार हे वयाच्या 83 व्या वर्षी देखील सांगितलेल्या शब्दाची पूर्तता दोन दिवसात करतात ही राजकारणारतली सकारात्मक बाब, असं मला वाटतं. आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा काही नेत्यांनी सांगितलं आम्ही देखील बाहेर पडणार आहोत. पण, समोर काही झालं नाही. त्यामुळं शरद पवारांचा हा गुण ‘त्यांनी’ घ्यावा, असा टोलाही त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला.

दरम्यान, अजित पवार गट सत्तेत आल्यानं शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का? असा प्रश्न विचारल्यावर सामंत म्हणाले, राज्यातील सत्ताधारी पक्षांतील सदस्यांची संख्या वाढली. त्यामुळं कमी पदे वाट्याला येतील, त्यामुळं नाराजी होऊ शकते. मात्र, एकनाथ शिंदेवर आमचा विश्वास आहे. आम्ही कोणाही राजीनामा देणार नाही. एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार ही अफवा आहे. आम्ही राजीनामे घेणारे आहोत. शिंदेच्या नेतृत्वाखाली आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुका होतील, असं सामंत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube