EX President Pratibhatai Patil land grab Jayakumar Rawal : जमीन हडपण्याच्या अनेक घटना आपण अनेकदा पाहतो. मात्र यावेळी थेट माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन थेट मंत्री असलेल्या जयकुमार रावल यांनी हडपली असल्याचा समोर आलं आहे. मात्र यानंतर रावल यांना धुळे जिल्ह्या न्यायालयाने चांगला दणका दिला आहे त्यांना ही जमीन परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पालन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या यांची दोंडाईचा या शिवारातील तब्बल 26 एकर जमीन हडप केल्याचा प्रकार समोर आला होता याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केले होते.त्यामुळे आता जयकुमार रावल यांचे कुटुंब जर थेट राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभाताई पाटील यांची जमीन हडपत असेल तर इतर गोरगरिबांचे काय? असा प्रश्न देखील अनिल गोटे यांनी उपस्थित केलाय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना तारीख पे तारीख! उन्हाळ्यातही निवडणुका नाहीच
तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे राष्ट्रपती पाटील यांची जमीन हडप केल्याचा समोर आल्यानंतर आता सिंदखेडातील गरिबांना कोण न्याय देणारा असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. तर जयकुमार रावल यांच्या बद्दल सांगायचं झालं तर धुळ्यातील सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे. खानदेशातील ऐतिहासिक परंपरा लाभलेला दोंडाईचा रावल संस्थानात त्यांचा जन्म झाला आहे. तर त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात होते त्यांनी महानगरपालिकेत नगरसेवक या पदापासून केली आहे. वयाच्या 28व्या वर्षी तत्कालीन मंत्री राहिलेला हेमंत देशमुख यांचा पराभव करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. तसेच त्यांनी इंग्लंडमधील कार्डिस विद्यापीठात बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलं आहे.