Download App

राज्यसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे फडणवीसांकडून कौतुक

  • Written By: Last Updated:

पुणे : राज्यसेवा परीक्षेसाठी आयोगाने लागू केलेला लेखी पॅटर्न हा 2025 नंतर लागू व्हावा या प्रमुख मागणीसाठी ‘एमपीएससी’च्‍या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्‍यांनी धरणे आंदोलन पुकारले होते. पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम यंदापासून नाही तर 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

एमपीएससीचा अभ्यासक्रम 2023 पासून अचानक बदलण्यात आला होता. युपीएससी परीक्षेसारखा हा अभ्यासक्रम केला गेला. मात्र, एमपीएससीचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा आणि आयोगाने या निर्णयाची अंबलबजावणी करावी या मागणीसाठी विद्यार्थी पुण्यात 20 फेब्रुवारीपासून रस्त्यावर होते. या आंदोलनाला अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता. या विद्यार्थी आंदोलकांना राष्ट्रवादी काँग्रेसच प्रमुख शरद पवार यांनी भेट दिली होती. शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोग, विद्यार्थी प्रतिनिधी यांचं बैठक घेण्याचं ठरलं होतं. ही बैठक आज नियोजित होती. मात्र बैठक न घेताच आयोगाने आज विद्यार्थ्यांच्या बाजुने निर्णय दिला.

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करून माहिती दिली.

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हा डाएट चार्ट फॉलो करून स्वतःला फिट ठेवते

एमपीएससीच्या या निर्णयाचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी स्वागत केले. एमपीएससीने आता नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल, अशा स्वरूपाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांनाही मनापासून शुभेच्छा! सरकारच्या विनंतीला मान देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थीहिताचा निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो की, कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च आहे, अशा आशयाचं फडणवीसांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली.

Tags

follow us