Tukaram Mundhe : FDA ची मोठी कारवाई; 4 अधिकारी निलंबित; कारण काय?

Tukaram Mundhe : अन्न व प्रशासन विभागातील आणखी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाया

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe : अन्न व प्रशासन विभागातील आणखी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाया केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. माहितीनुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन एसईझेड युनिटवर कारवाया केल्या होत्या. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने बिनशर्त माफी देखील मागितली होती. यानंतर आता चारही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नुकतंच सुपारी घोटाळा प्रकरणात 5अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.

प्रकरण काय ?

पुण्यातील (Pune) मावळ तालुक्यातील टाकवे गाव येथे असणारी सोएक्स इंडिया प्रायव्हेट लि. (Soex India Pvt. Ltd.) ही कंपनी हुक्क्यासाठी वापरले जाणारे पदार्थ बनवते मात्र त्याला खाद्यपदार्थ गृहीत धरुन अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. कंपनीने या कारवाईविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात फसाईचे स्पष्टीकरण मागवण्यात आले होते.

महाराष्ट्रात पुन्हा धो धो…, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी –

फसाईने देखील ज्या वस्तूवर कारवाई करण्यात आली आहे ते फूड या व्याख्येत येत नाही असं सांगितल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असे लेखी शपथपत्र सरकारला न्यायालयात द्यावे लागले होते. या प्रकरणात दि. व. भोगावडे, सहआयुक्त, पुणे, य. बा. दहातोंडे, सहाय्यक आयुक्त, नागपूर, अशोक इलागेर आणि च. रा. स्वामी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

चंद्र राहूच्या नक्षत्रात, आज ‘या’ तीन राशींच्या लोकांना होणार धनलाभ-

Exit mobile version