Food and Drug Administration : आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचं अन्न व औषध प्रशासन विभाग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एफडीएकडून गेल्या काही दिवसात राज्यातील विविध ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करण्यात येत आहे. याच कारवाई अंतर्गत जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळयुक्त तूप निर्मिती करणाऱ्या दुकानावर छापा टाकत 13 लाख 4 हजार 539 रुपयांचा साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर 3 जून रोजी जालन्याच्या (Jalna) तीर्थपूरी येथील मे.मुंदडा इंडस्ट्रीजची तपासणी करण्यात आली. खाद्यतेल आणि विविध प्रकारचे एसेन्स वापरुन तुपासारखा दिसणारा पदार्थ तयार करुन विक्री करण्यात येतअसल्याची यावेळी माहिती समोर आली आहे.
या कारवाई दरम्याान एकूण 1903 लिटर साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत 13 लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमध्ये 1121 लिटर पॅकबंद तूप, 8663 लिटर खुले तूप आणि 118 लिटर रिफाइंड सोयाबीन तेल आढळून आले.
मोठी बातमी! ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन
या धक्कादायक घटनेनंतर पुढील तपासणीसाठी जप्त केलेले सर्व नमुने प्रयोगाशाळेत पाठविण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
