तुकाराम मुंढेंचा हंटर ! एकाच दिवसात 43 ठिकाणी छापेमारी; तब्बल कोट्यवधी रुपयांची सुपारी जप्त

Tukaram Mundhe-Tukaram Mundhe-. 21 जणांना अटक करण्यात आली असून, तब्बल 17 दुकाने सील करण्यात आली आहे. तर एक वाहन जप्त करण्यात आली आहे.

FDA Tukram Munde

FDA Tukram Munde

FDA Raid 43 Places : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त (FDA) तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या आदेशाने अधिकारी हे राज्यभरात छापेमारी करत आहेत. बुधवारी एका दिवसात राज्यभरात 43 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. त्यात तब्बल 3 कोटी 95 लाखांचा बंदी असलेला पान मसाला, गुटखा, निकृष्ट दर्जाची सुपारी जप्त करण्यात आली आहे. 21 जणांना अटक करण्यात आली असून, तब्बल 17 दुकाने सील करण्यात आली आहे. तर एक वाहन जप्त करण्यात आली आहे. तर अन्नपदार्थांवरील कारवाईत 3 कोटी 94 लाखांचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहे.

करण्यात आली आहे. रंगीत व खराब दर्जाची सुपारी वाहतूक करताना आढळून आली आहे. सुमारे तीन कोटीहून अधिक किंमतचा 73 हजार 494 किलो साठा जप्त करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात भेसळयुक्त सुपारी कर्नाटकमधून दिल्लीला घेऊन जात असणारे वाहने पकडली. त्यात सुमारे 73 लाखाहून अधिक किंमतचा 24 हजार पाचशे किलोचा माल जप्त केला आहे. मुंबईतील अंधेरीत लेबल नसलेले तसेच वापर केलेल्या पिशव्यामध्ये साठवलेला कृत्रिम रंगमिश्रीत चहा पावडर जप्त करण्यात आली. त्यात 2 लाखाहून अधिक किंमतचा 917 किलोचा साठा जप्त करण्यात आला आहे.

भुजबळ ‘कबड्डीपटू’, पटेल ‘फुटबॉलपटू’ तर, मुश्रीफ ‘कुस्तीपटू; तटकरेंनी दिलेल्या उपमांचे अर्थ काय?


कुठे-कुठे झाली कारवाई ?

10 जूनला तब्बल 21 आरोपी अटक करण्यात आली आहे. 17 आस्थापना सील व लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध कारवाई झाली आहे. कोकण विभागात तव्वल 13 आस्थापनाविरुद्ध कारवाई करून 14 लोकांना अटक करण्यात आली. पुण्यात एक ठिकाणी कारवाई करून एक जणांना अटक केली आहे. नागपूर विभागात 2 संस्थेवर कारवाई करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

सीएमआरच्या चार्टर विमानात अचानक तांत्रिक अडचण; सुनेत्रा पवारांचा दिल्ली प्रवास उशिरा, सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित

अन्न पदार्थांचा 3 कोटी 94 लाखांचा साठा जप्त
तसेच राज्यातील 13 अस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. यात सुपारी, खाद्यतेल, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खवा, पेढा, तूप, गुळ इत्यादी अन्नपदार्थ तसेच भेसळकारी पदार्थाचा सुमारे 3 लाख 94 हजार किंमतीचा 1 लाख 7 हजार 749 किलो साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आला आहे. तर अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणात गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत.

Exit mobile version