सुटे मसाले विक्री करण्यास बंदी; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे नवे आदेश

FDA Tukaram Mundhe New Guidelines for Spices; अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मसाल्याबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत.

FDA Tukaram Mundhe New Guidelines for Spices

FDA Tukaram Mundhe New Guidelines for Spices

FDA Tukaram Mundhe New Guidelines for Spices: मसाल्यांमध्ये भेसळ करणे, प्रतिबंधित रंग मिसळणे आणि ग्राहकांची दिशाभूल करणारे दावे करणे आता महागात पडू शकते. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि पॅकिंग याबाबत नवीन आदेश दिले जारी केले आहेत.मसाले उघड्यावर वाळवणे आणि सुट्या मसाल्यांची विक्री करण्यासही मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा मुंढे यांनी दिला आहे. मसाल्यांमध्ये वीटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा किंवा निकृष्ट दर्जाचे मसाले मिसळले जात असल्याचे एफडीएच्या निदर्शनात आले आहे. त्यामुळे हे नवीन आदेश देण्यात आले आहेत.

दिग्गज राजकारण्यांना जिल्हा बँकेत नो एन्ट्री; कोण-कोण नेते बाहेर राहणार ?

उघड्यावर मसाले वाळवता येणार नाहीत

मसाल्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यासाठी उत्पादन व साठवणुकीच्या ठिकाणी स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक असेल. मसाले सार्वजनिक रस्त्यांवर, गटारांजवळ, जनावरांच्या गोठ्याजवळ किंवा कचरा साठवण्याच्या ठिकाणांजवळ वाळवता येणार नाहीत. मसाल्यांमध्ये मेटानिल यलो, रोडामाइन बी आणि सुदान डाईज यांसारखे प्रतिबंधित रंग तसेच इतर भेसळयुक्त पदार्थ मिसळण्यास मनाई करण्यात आली आहे.

मसाल्यांच्या पॅकिंगवर कोणती माहिती आवश्यक?

मसाला उत्पादकांकडे वैध अन्न परवाना असणे अनिवार्य आहे. पॅकिंगवर उत्पादनाचे नाव, त्यातील घटक पदार्थ, पॅकिंगची तारीख आणि वापरण्याची अंतिम मुदत यांची माहिती स्पष्टपणे नमूद करावी लागेल. ग्राहकांची दिशाभूल करणारे किंवा पुराव्याशिवाय शुद्धतेचे दावे करणाऱ्या उत्पादकांवरही कारवाई होऊ शकते.

सहर शेखच्या वडिलांची शिंदेसेनेत वर्णी? युनुस शेख यांच्या नियुक्तीमुळे ठाण्यात राजकीय चर्चांना उधाण

मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी इथिलीन ऑक्साईडला बंदी

मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी इथिलीन ऑक्साईडचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. मसाल्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी निर्धारित नियमांचे पालन करणे उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी आवश्यक असेल.

नियम मोडल्यास दंड आणि कारावास

मसाल्यांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याचे स्वरूप आणि त्यातून झालेल्या परिणामांनुसार कारावास व दंडाची तरतूद आहे. गंभीर प्रकरणांत सात वर्षांपासून कारावासाची शिक्षा आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड, गंभीर दुखापत झाल्यास सहा वर्षांपर्यंत कारावास व पाच लाख रुपयांपर्यंत दंड, तर असुरक्षित अन्नामुळे गंभीर दुखापत न झालेल्या प्रकरणांत एक वर्षापर्यंत कारावास आणि तीन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. वैध परवाना नसणे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा पॅकिंगवर आवश्यक माहिती नसणे यांसारख्या उल्लंघनांसाठीही दंडाची तरतूद आहे.

‘ज्ञानेश कुमार मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी मदत करत आहेत’; अभिजीत दिपकेचे गंभीर आरोप!

मसाल्यांमधील भेसळ रोखणे, ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळवून देणे आणि उत्पादन प्रक्रियेत पारदर्शकता राखणे हा या FDA च्या निर्देशांचा उद्देश आहे.

Exit mobile version