Download App

पराभवाच्या भीतीने भाजपने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका पुढे ढकलल्या

  • Written By: Last Updated:

पुणे : देशभरात होणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका भाजपने पराभवाच्या भीतीने देशभरात त्यांना होत असलेला विरोध लोकांमध्ये असलेली प्रचंड नाराजी या भूमिकेतून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारांचे फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत त्यांचा आलेल्या सर्वे तसेच देशभरात होत असलेली त्यांच्या विरोधातील वातावरण नुसतीच आश्वासने देणे महागाई बेरोजगारी याचबरोबर स्थानिक पातळी वरील प्रश्न न सोडवणे यासारखे अनेक समस्या पण आता डोकेदुखीच्या ठरत आहेत.

पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा कसबा विधानसभामध्ये झालेला विजय हा नवीन पॅटर्नची नांदी ठरवतो त्यामुळे पराभवाच्या छायेपासून दूर राहण्यासाठी आता नवीनच प्रकार सुरु केला आहे.ही एकप्रकारे संविधानाची मोडतोड सुरू आहे जी म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन निवडणूक रद्द करणे यामुळे लोकांचा आता नक्की निवडणुका होणार कधी देशामध्ये अघोषित हुकुमशाही याचे रूपांतर आता घोषित हुकूमशाही होणार की काय असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी विचारला आहे.

Farmer Long March : शेतकऱ्यांच्या मोर्चाला मोठं यश; CM शिंदेंची मोठी घोषणा 

देशभरातल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नागरिकांनाही यासंदर्भात निवडणुका घेवून त्यांचं जनमत व्यक्त करण्याचा अधिकार आहे हा एका प्रकारे संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार वारंवार पुढे ढकलणे अथवा विहित कालावधीत निवडणूक न घेणे म्हणजे लोकशाही ची एक प्रकारे पायमल्लीत होत आहे. याचबरोबर राज्यातील महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही एक प्रकारे पुढे ढकलून जनमताचा अनादरच सुरू आहे. ही एका प्रकारे भाजपकडून ही एका प्रकारे लोकशाही ची पायमल्ली सुरू आहे.

Tags

follow us