नीट परीक्षेतील गोंधळानंतर आता महाज्योती परीक्षेवरून वाद, पुण्यात कॉम्प्युटर नसल्याने विद्यार्थिनींची परीक्षा रद्द

परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचल्या, मात्र केंद्रावर आवध्यक सण्णकनची व्यवस्था उपलब्ध नसल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला.

Untitled Design   2026 10 07T125101.770

Untitled Design 2026 10 07T125101.770

Female students’ exam cancelled due to lack of computers : गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांमध्ये परीक्षांमधील गोंधळ आणि गैरव्यवस्थापनाचे प्रकार समोर येत आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात आंदोलने झाली होती. त्यानंतर आता महाज्योतीच्या स्कॉलरशिप परीक्षेवरून देखील आज गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर पोहोचल्या, मात्र केंद्रावर आवध्यक सण्णकनची व्यवस्था उपलब्ध नसल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला. त्यामुळे परीक्षा सुरू होण्याची वेळ उलटून गेल्यानंतर देखील त्यांना परीक्षा देता आली नाही आणि अखेर परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सन ब्राईट स्कुल या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. महाज्योतीची स्कॉलरशिप परीक्षा सकाळी 9 ते 11 या वेळेत होणार होती. मात्र परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध नसल्यामुळे परीक्षा सुरूच होऊ शकली नाही. सकाळपासून विद्यार्थिनी परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभ्या होत्या. विशेष म्हणजे अनेक तास उलटूनही परीक्षा देण्याची संधी न मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

ॲड. अभय मराठे मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण, प्रॉपर्टीच्या वादातून आजोबांनीच झाडली नातवाच्या छातीत गोळी

परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींनी सकाळपासून अन्न-पाण्याविना परीक्षा केंद्राबाहेर उभे राहावे लागल्याचा आरोप केला. परीक्षा का सुरू होत नाही, याबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने वेळेत विद्यार्थिनींशी संपर्क साधला नसल्याचा आरोप करत विद्यार्थिनींनी परीक्षा केंद्राच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर अधिकाऱ्यांकडून परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

दरम्यान, महाज्योतीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा इशारा दिला. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे येऊन या परीक्षेतील गोंधळाची माहिती दिली असून, विद्यार्थ्यांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत असेल तर महाज्योतीच्या कारभाराबाबत जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली. तसेच या प्रकरणी मंत्री अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version