Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमराठी भाषिकांविरुद्ध चिथावणीखोर भाषणे आणि प्रक्षोभक वक्तव्ये केल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन मनसेची (MNS) मान्यता रद्द करण्यात यावी या मागणीसाठी उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र या प्रकरणात सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमुर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांना फटकारले आहे.
न्यायालयाने याचिकेच्या वैधतेवर सवाल उपस्थित करत उत्तर भारतीय आणि अमराठी भाषिक हे शब्द याचिकेतून वगळण्याचे निर्देश दिले. तसेच उत्तर भारतीय आणि अमराठी असा वाद उपस्थित करण्याची गरज काय असा सवाल देखील न्यायालयाने याचिकाकर्ता सुनील शुक्ला यांना विचारले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सुनावणी करताना हा वाद केवळ द्वेषपूर्ण भाषण या शब्दातून सांगता येऊ शकतो आणि हा शब्द याचिकाकर्त्यांच्या भावना व्यक्त करण्यास पुरेशा आहे असं म्हटले आहे. यानंतर याचिकेतून उत्तर भारतीय आणि अमराठी शब्द वगळण्याची तयारी याचिकाकर्त्यांने वगळण्याची तयारी दर्शवली. यानंतर उच्च न्यायालयाने या याचिकेची नोंद घेत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला 4 आठवड्यात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
याचिकेत नेमकं काय?
उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सुनील शुक्ला (Sunil Shukla) यांनी या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरुन अमराठी भाषिकांना टार्गेट करत आहेत. त्यांच्या भाषणामुळे राज्यात उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसेच्या घटना वाढत चालल्या आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे आणि मनसे या राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
Dhaka Violence : शेख हसीनाला मृत्युदंडाची शिक्षा अन् ढाकामध्ये हिंसाचार, दोन जणांचा मृत्यू
