Fire Break Out At Rajendra Shingne Bngalow In Buldhana : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांच्या बुलढाणा येथील बंगल्यात (Buldhana)भयंकर स्फोट झाला. त्यामुळे किचनमध्ये आग लागली. संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय. शुक्रवारी रात्री हा स्फोट झाला. परंतु घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली (Sharad Pawar Party) नाही. परंतु, किचन आणि त्यातलं साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याचे पाहायला मिळाले.
किचनला आग लागल्याचं समोर
रात्री अचानक किचनच्या बाजूने जोरात स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यानंतर किचनला आग लागल्याचं समोर आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित आग आटोक्यात आणली. आगेमुळे किचनमधील सर्व साहित्य (Fire Break Out At Rajendra Shingne Bngalow) ज्यात अॅसी, उपकरणे, भांडी, अन्नपदार्थ यांचं मोठं नुकसान झालंय. घटनेवेळी डॉ. शिंगणे आणि त्यांच्या कुटुंबीय बाहेरगावी होते. घरात कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
मोठी बातमी! पुण्यातील जेजुरीजवळ भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 5 गंभीर जखमी
फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट
फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे चिखली रोडवर निवासस्थान आहे. त्या घरात फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला अन् मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ही घटना 18 जून रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडल्याचं सांगितलं जातंय. स्फोटानंतर मोठी आग लागली. या आगीने संपूर्ण स्वयंपाक घराचे नुकसान झालंय. परंतु, अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळ गाठले अन् आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मोठा अनर्थ टळला
स्फोट इतका मोठा होता की, किचनमधील सगळेच साहित्य जळून खाक झालंय. भिंती सुद्धा काळ्या पडल्या आहेत, फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने घरातील इतर वस्तूंचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अचानक आग लागल्यामुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. घटनेच्या वेळी डॉ. शिंगणे नागपूर येथे कामानिमित्त होते. घटनेदरम्यान घरामध्ये त्यांचे मानसपुत्र पुष्पक शिंगणे, त्यांची पत्नी आणि काही कर्मचारी उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. परंतु या घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही.
लग्नाचे योग, व्यवसायात यश; आजचा दिवस ‘या’ राशींसाठी फलदायी
स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण केले होते. धोका असताना देखील पुष्पक शिंगणे यांनी प्रसंगावधान राखत घरातील गॅस सिलिंडर वेळेत बाहेर काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.