Fire breaks out at Sayaji Shinde’s Deorai Fears that rare medicinal plants and animals burnt to ashes : अभिनेते सयाजी शिंदे हे पर्यावरणासाठी आवाज उठवणारे आणि त्यासाठी पुढाकार घेऊन काम करणारे एक पर्यावरणवादी देखील आहेत. नुकतच त्यांनी कुंभमेळ्यासाठी सरकारकडून नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला प्रचंड विरोध केला आहे. त्यानंतर आता मात्र एक धक्कादायक बातमी समोर आली आहे की, शिंदे यांच्या देवराई प्रकल्पाला आग लागली आहे.
देश हादरला! कर्नाटकमध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात 17 जणांचा जागीच मृत्यू, 21 प्रवासी जखमी
शिंदे यांनी हा देवराई प्रकल्प बीड जिल्ह्यातील पालवन या ठिकाणी गेल्या काही वर्षांपूर्वी उभारला होता. यामुळे उनाड माळरानावर निसर्ग फुलला होता या ठिकाणी हजारो दुर्मिळ औषधी वनस्पती देखील होत्या. मात्र या ठिकाणी काही झाडांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही अग्निशामक आणि वनविभागाकडून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवी सुरुवात करताना सावधान!’ या’ पाच राशींच्या जीवनात उलथा पालथ होण्याची शक्यता…
शिंदे यांनी या ओसाड डोंगराला हिरवगार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते बीड सारख्या पाण्याचा प्रचंड अभाव असणाऱ्या भागामध्ये त्यांनी उन्हाळ्यात देखील चक्क टॅंकरने पाणी घालून ही जाड जगली होती या जंगलामुळे परिसर हिरवळीसह विविध पशुपक्षांनी नटला होता.
