Download App

मोठी बातमी! मावळ लोकसभा मतदारसंघातील पाच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Eknath Shinde : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने आज पाकिस्तानला धडा शिकवला. मात्र ऑपरेशन सिंदूर हा ट्रेलर

Eknath Shinde : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने आज पाकिस्तानला धडा शिकवला. मात्र ऑपरेशन सिंदूर हा ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांचे आज कौतुक केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील पाच नगरसेवकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईत झालेल्या या सोहळ्यात खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेते संजय निरुपम, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच म्हटले होते. आजचा एअर स्ट्राईक हा ट्रेलर असून खरा पिक्चर अजून बाकी आहे. पूर्वी आपल्या जवानांचा शिरच्छेद करुन पाकिस्तानात घेऊन जाण्याचे पाप दहशतवाद्यांनी केले होते. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी पाकड्यांना प्रत्युत्तर दिले नव्हते. दहशतवादी हल्ल्यानंतर ते मूग गिळून बसले होते, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातला हा नवा भारत आहे. घरात घुसून मारु अशा प्रकारची प्रतिक्रिया देणारा हा भारत आहे, असे ते म्हणाले.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निष्पाप नागरिकांची हत्या केली, तर आज एअर स्ट्राईक करताना आपल्या सैन्याने पाकिस्तानातील निरपराध नागरिकांची काळजी घेतली. यापुढे देखील पाकड्यांना असेच चोख उत्तर मिळेल, याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. कारण सर्व देशवासीय मोदीजींच्या पाठिशी उभे आहेत असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पिंपरी चिंचवड महापालिकेतील तीन नगरसेवकांनी आणि लोणावळा नगरपरिषेदतील दोन नगरसेवकांनी शिवसेनाचा धनुष्यबाण हाती घेतला. यात बाळासाहेब ओव्हाळ, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, अनंता आंद्रे, दत्तात्रय झाडे, भाऊसाहेब सकाटे, मदन शेडगे, सोमनाथ कोंडे, प्रकाश पाठारे, रमेश नगरकर, आनंद जांभळे, हनुमंत ठाकर, सुरेश लाड, वैभव हजारे, राजेश वाघवले, नवनाथ हारपुडे, श्रीपत तुर्डै, कैलास खरमारे, अमिता गायकवाड, प्रिया पवार, विजय अखाडे, संकेत जाधव, बाळासाहेब वाल्हेकर, राजु खांडभोर, दत्ता केदारी, राम सावंत, संजय भोईर, शिला भोंडवे, शुभांगी काळंगे, सुनील हगवणे अशा मावळ मतदार संघातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा पक्षाच्या संघटक, उपशहरप्रमुख, शाखा प्रमुख, तालुका संघटक, युवक काँग्रेस अध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण? ‘या’ 3 नावांची चर्चा

शिवसेना उपनेते संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील स्थानीय लोकाधिकार समितीचे विजय परब यांनी कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. स्थानीय लोकाधिकार समिती शिस्तबद्धपद्धतीने पक्ष संघटन वाढवण्याचे काम बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत होती, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

follow us