Sangali Accident : विजापूर-गुहागर राज्यमार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

Five dead in Sangali Accident : सांगली जिल्ह्यामध्ये भीषण अपगात झाला. जत तालुक्यातील विजापूर-गुहागर राज्यमार्गावर अमृतवाडी फाटा याठिकाणी एका स्विफ्ट कार आणि एका डंपरची जोरात धडक झाल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये चालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यात मृत पावलेल्या लोकांमध्ये एकाच कुटुंबातील चार जण आणि चालक असे लोक […]

पुण्यात भीषण अपघात! ट्रकने दुचाकीला चिरडले, दोन युवकांचा मृत्यू; एक जखमी

Nashik Accidents 1

Five dead in Sangali Accident : सांगली जिल्ह्यामध्ये भीषण अपगात झाला. जत तालुक्यातील विजापूर-गुहागर राज्यमार्गावर अमृतवाडी फाटा याठिकाणी एका स्विफ्ट कार आणि एका डंपरची जोरात धडक झाल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये चालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

यात मृत पावलेल्या लोकांमध्ये एकाच कुटुंबातील चार जण आणि चालक असे लोक होते. तर एक मुलगा यामध्ये जखमी झाला असून त्याला रूग्णालायात दाखल करण्यात आले असून हे कुटुंब सांगलीतील जत तालुक्यातीलच असल्याचं सांगण्यात येत आहे. हे कुटुंब गाणगापूरवरून परत येत असताना हा अपघात झाला.

Amol Kolhe:…म्हणून ‘त्या’ चिमुकल्यांचे पाया पडले! भारावलेल्या अमोल कोल्हेंनी केलेली कृती चर्चेत

दोनच दिवसांपूर्वी विटा सातारा रोडवर अपघात

सांगली (Sangli)जिल्ह्यात 4 एप्रिलला कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (Big Accident)झाला. हा अपघात विटा सातारा रोडवर (Satara Road) नेवरी गावाजवळ झाला. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश होता.

विटा हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे राज्यमार्गावर असलेल्या उताराच्या ठिकाणी हा अपघात झाला. कार गाडीमध्ये एकूण पाच जण प्रवास करीत होते. चालकाच्या बाजूला बसलेली व्यक्ती ही अपघातानंतर गाडीतील एअरबॅग उघडल्याने बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version