आजचा दिवस उजाडला अन् अवघ्या महाराष्ट्रावर जणू दुखाचा डोंगर कोसळला. (Baramati) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत बारामतीमध्ये निधन झालं. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत गुरुवारी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांचं सात्वंन केलं. अजित पवार यांचे पार्थिव आज सायंकाळी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आलं. तेथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटला. विविध पक्षाचे राजकीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
अजित पवार यांच्या अकाली जाण्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. वेगवान कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांना विमानाच्या वेगवान प्रवासानंच बळी घेतला. अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आणल्यानंतर उपस्थितांनी मोठा आक्रोश केला. सगळ्यांना दादांचे दर्शन मिळेल कोणीही गर्दी करू नका, असं आवाहन करण्यात आले. मैदानातील शेवटच्या मणसाला देखील अजित पवारांचे दर्शन मिळेल, असे म्हणत नागरिकांना आवाहन केलं. बारामतीकर ऐकत नसल्याने अखेर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी शांत होण्याचे आवाहन केले आहे.
आमच्यासाठी प्रचंड मोठा धक्का; अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर नेता आहे. सगळी कामं वेळेत करण्यावर भर देणारा, वेळेला महत्व देणाऱ्या या नेत्यांची बुधवारची वेळ मात्र चुकली.. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रचारासाठी बारामतीत सभेसाठी निघालेल्या अजित पवारांचं विमान बारामतीत लँड होतानाच क्रॅश झालं. बिझनेस क्लासचा बादशाह अशी ओळख असलेल्या व्हीएसआर’ या ऑपरेटरचे ‘लिअरजेट 45’ श्रेणीतील हे विमान.. पण, याच विमानानं अजित पवारांचा घात केला. मुंबईहून सकाळी बारामतीच्या दिशेनं निघालेल्या विमानात सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळं विमानाचा भीषण अपघात झाला आणि यात विमानातील अजित पवारांसह पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला.
अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुंबई येथील लोकभवनातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला. या तीन दिवसांच्या कालावधीत राज्यातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे २८ जानेवारी रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले.
- सकाळी पावणे नऊचा वेळ असल्यानं बारामतीत दाट धुक्यामुळे दृश्यमानता खूप कमी होती
- बारामतीच्या धावपट्टीवर आयएलएस प्रणाली उपलब्ध नाही
- त्यामुळं पायलटला व्हिज्युअल आणि मॅन्युअल लँडिंग करावं लागलं
- पण, पहिल्यांदा धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमानानं हवेत वळण घेतलं
- त्यामुळं पायलटचा पहिल्या लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला
- पहिल्यांदा अपयश आल्यानं पायलटकडून विमान लँडिंगचा दुसरा प्रयत्न झाला
- पण, धुक्यामुळे विमान आणि धावपट्टीचं अचूक अलाईन्मेंट करणं कठीण जात होतं.
- त्यामुळं या आपात्कालीन स्थितीत पायलटकडून ‘MAYDAY’ संदेश देण्यात आला
- हे सगळं सुरू असतानाच जमिनीपासून 100 फूट उंचीवर विमानाचा कंट्रोल सुटला
- बारामतीची धावपट्टी ही टेबल टॉप आहे असल्यानं
- लँडिंगच्या प्रयत्नात विमान धावपट्टीच्या टोकावर कोसळलं
- विमान जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट झाला,त्यानंतर 4-5 स्फोट झाले
- स्फोटानंतर विमान आगीत जळून खाक झाली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली
- आगीची तीव्रता जास्त असल्यानं बचावकार्य अशक्य बनलं.
