बदलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या (Mumbai) अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनाने कठोर निर्णय घेतला आहे. आता राज्यातली सर्व पूर्व प्राथमिक शाळा शासनाच्या अखत्यारित येणार असल्याची घोषणा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली आहे. आतापर्यंत पूर्व प्राथमिक शाळा शासनाच्या अखत्यारित असण्यासंदर्भात कोणत्याही तरतूदी नव्हत्या.
साधारण ७-८ महिन्यांपूर्वी ही बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने पूर्व प्राथमिक शाळांसदर्भात नवीन कायदा तयार करण्याच्या सुचना शासनाला दिल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर कायदा तयार करून राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक शाळा शासनाच्या अख्त्यारित येतील. त्याचबरोबर यासंदर्भात एक अभ्यासगट तयार करून त्यांनी मसूदा तयार केलेला आहे.
मोठी बातमी! पुणे महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर, काय आहे कारण?
शाळेची नियमावली कशी असावी, तिथे काय सुविधा असावी, तिथली देखरेख आणि मनुष्यबळ कसे कार्यरत असावे याबाबत काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच या कायद्याचे प्रारूप तयार झाल्यानंतर त्यावर विधिमंडळाची मान्यता घेण्यात येईल.याबाबत शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि गृह विभागाची एकत्रित बैठक घेऊन याची कार्यप्रणाली अधिक मजबूत कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बदलापूर येथील एका पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीसोबत ती शाळेच्या व्हॅनने घरी जात असताना चुकीचा प्रकार घडला. तिच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली. तसंच त्या व्हॅनचा परवाना रद्द करण्यात आला आहे,” असेही राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले.
