मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोर्टानंतर ईडीकडून भुजबळांना दिलासा

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची कोर्टानंतर आता इडीकडूनही महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

News Photo   2026 01 23T163000.003

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोर्टानंतर इडीकडून भुजबळांना दिलासा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, (NCP) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांची कोर्टानंतर आता ईडीकडूनही महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आधी एसीबीकडून छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला होता, त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, त्यानंतर आता इडीनेही भुजबळ यांना मोठा दिलासा दिला आहे.

पुरावा उपलब्ध नाही

सप्टेंबर 2021 मध्ये विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांना या प्रकरणातून दोषमुक्त केले होते. न्यायालयाने स्पष्ट केले की, विकासकाने भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाला 13.5 कोटी रुपये दिल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. तसेच एसीबीने केलेला नफा-तोट्याचा हिशोब अयोग्य आणि बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.

बारामतीत अजितदादांची वेगळी चाल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावललं?

कंत्राटाचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, परिवहन मंत्री आणि सात वरिष्ठ नोकरशहांच्या समितीसमोर गेला होता. त्यामुळे केवळ चुकीची माहिती देऊन या सर्वांची दिशाभूल केली गेली, हे मान्य करणं कठीण असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.

हेक्सवर्ल्ड प्रकल्प प्रकरण

दुसरीकडे, नवी मुंबईतील ‘हेक्सवर्ल्ड’ नावाच्या गृहनिर्माण प्रकल्पात सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज आणि पुतण्या समीर यांच्यावर होता. 2344 फ्लॅट्स विकून 44 कोटी रुपये गोळा केले गेले, परंतु प्रकल्प पूर्ण झाला नाही, असे सांगण्यात आले होते. सप्टेंबर 2021 मध्ये विशेष न्यायालयाने पंकज आणि समीर भुजबळ यांना या फसवणुकीच्या प्रकरणातून दोषमुक्त केलं होतं.

 

Exit mobile version